विशेष प्रतिनिधी
अलिबाग : अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत अक्षया प्रशांत नाईक यांनी ऐतिहासिक विजय मिळवत शहराच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला आहे. सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्याने अलिबागमध्ये उत्साहाचे वातावरण असून, नागरिक, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक घटकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Akshaya Prashant Naik
अलिबाग नगरपालिकेवरील शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला पुन्हा एकदा अबाधित राहिला. नाईक कुटुंबाची अलिबागवरील राजकीय पकड पुन्हा एकदा दिसून आली. शेतकरी कामगार पक्षाच्या अक्षया नाईक यांनी भाजपच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांचा पराभव करत नगराध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह अलिबाग नगरपालिकेवर गेल्या चार दशकांपासून कायम असलेले शेकापचे वर्चस्व आणखी भक्कम झाले आहे. अक्षया नाईक या नाईक कुटुंबातील सातव्या नगराध्यक्ष ठरणार आहेत.
अलिबाग नगरपालिकेच्या २० प्रभागांसह नगराध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली होती. यापूर्वीच माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक हे बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे आता अलिबागच्या नगर परिषदेत लेक नगराध्यक्ष आणि वडील नगरसेवक असे चित्र दिसणार आहे. उर्वरित १९ प्रभागांसाठी आणि नगराध्यक्षपदासाठी २ तारखेला मतदान झाले. दोन प्रभागांचा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी दुरंगी लढत पाहायला मिळाली.
या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे पारंपरिक विरोधी पक्ष एकत्र आले, तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने युती करून शेकाप–काँग्रेस आघाडीला आव्हान दिलं. त्यामुळे ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत चुरशीची ठरली होती.
शेकापच्या अक्षया नाईक यांना ८,९७४ मते, तर तनुजा पेरेकर यांना २,३३४ मते मिळाली. अक्षया नाईक यांनी ६,६४० मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत शेकापचा किल्ला अभेद्य असल्याचं पुन्हा सिद्ध केलं.
अक्षया नाईक या माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या असून त्यांचा स्थानिक राजकारणात चांगला प्रभाव आहे. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली होती.
Akshaya Prashant Naik Becomes Alibag’s Youngest Mayor as Shekap Retains Its Stronghold
महत्वाच्या बातम्या
- नगरपालिका निवडणुकीतील सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- पुणे जिल्ह्यात अजित पवारच ‘दादा!’ १७ पैकी १० नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादीची बाजी
- मुश्रीफ – घाटगे जोडीची कागलमध्ये कमाल, 23 पैकी 23 जागा जिंकत एकहाती सत्ता
- Girish Mahajan त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत मंत्री गिरीश महाजन यांना धक्का, शिर्डीत विखे पाटलांची सत्ता