विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल अखेर जाहीर झाला असून महायुतीने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही महायुतीने घवघवीत यश मिळवत राज्याच्या राजकारणावर आपली पकड मजबूत केली आहे. या निकालात भाजप ‘नंबर वन’ ठरला असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. Mahayuti Surges
राज्यातील एकूण २८८ नगरपालिका व नगरपंचायतींपैकी तब्बल २१३ ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपचे १२९, शिवसेना (शिंदे गट) ५८, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ३७ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. याउलट महाविकास आघाडीची कामगिरी मर्यादित राहिली असून ठाकरे गट, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि इतर घटक मिळूनही अर्धशतकाचा आकडा गाठता आला नाही.
कोकणातील मालवण आणि कणकवली या मतदारसंघांत भावकीची राजकीय लढत पाहायला मिळाली. निलेश राणे विरुद्ध नितेश राणे या स्पर्धेत अखेर निलेश राणे यांनी १०१९ मतांच्या फरकाने विजय मिळवला. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
शिंदे गटाच्या बालेकिल्ल्यांना भाजपचा सुरुंग
निवडणुकीआधी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील मतभेद दिल्ली दरबारी पोहोचले होते. त्याचे पडसाद प्रत्यक्ष निवडणुकीत दिसून आले. अंबरनाथ आणि बदलापूर या शिंदे गटाच्या बालेकिल्ल्यांत भाजपने मोठी मुसंडी मारली. बदलापुरात शिवसेनेच्या सविता घोरपडे विजयी झाल्या असल्या तरी भाजपचे तब्बल २२ नगरसेवक निवडून आले. शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे, त्यांची पत्नी आणि भावाला पराभवाचा धक्का बसला.
तरुण चेहऱ्यांचा उदय
एकंदरीत, महायुतीच्या जोरदार यशाने राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलली असून, भाजपने आपले वर्चस्व अधिक ठामपणे अधोरेखित केले आहे. महाविकास आघाडीसमोर आत्मपरीक्षणाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
Mahayuti Surges, MVA Slips: BJP Emerges ‘Number One’ as Maha Vikas Aghadi Fails to Cross 50 Mark
महत्वाच्या बातम्या
- नगरपालिका निवडणुकीतील सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- पुणे जिल्ह्यात अजित पवारच ‘दादा!’ १७ पैकी १० नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादीची बाजी
- मुश्रीफ – घाटगे जोडीची कागलमध्ये कमाल, 23 पैकी 23 जागा जिंकत एकहाती सत्ता
- Girish Mahajan त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत मंत्री गिरीश महाजन यांना धक्का, शिर्डीत विखे पाटलांची सत्ता