विशेष प्रतिनिधी
मुंबई : Pratap Sarnaik मिरा-भाईंदर महापालिकेच्या अंतिम प्रभाग मतदार यादीत शासकीय अधिकार्यांच्या मदतीने राजकीय व्यक्तींनी हस्तक्षेप केल्याचे आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहेत.Pratap Sarnaik
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महापालिकेकडून नोव्हेंबर महिन्यात प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीवर नागरिकांना हरकती व सूचना नोंदवण्यासाठी १० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त हरकती व सूचनांची दखल घेत प्रशासनाने १५ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली. मात्र, प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या या अंतिम यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे आरोप होत आहेत.Pratap Sarnaik
दरम्यान, महापालिकेच्या मतदार यादीत घोळ घालण्यात महापालिकेच्या अधिकार्यांचा सहभाग असल्याचे आरोप खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहेत. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना पत्र लिहून अतिरिक्त आयुक्त प्रियांका राजपूत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.या संपूर्ण प्रकारात महापालिकेतील अतिरीक्त आयुक्त प्रियांका राजपूत, सहायक आयुक्त चंद्रकांत बोरसे, कौशिक घरत,महेश पाटील आणि टॅक्स विभागाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मतदार यादी अंतिम करण्याच्या प्रक्रियेदरम्यान काही महापालिका अधिकारी दोन दिवस रात्री उशिरापर्यंत पालिकेत काम करत होते. या काळात काही राजकीय व्यक्तीही महापालिकेत उपस्थित होत्या, असा आरोप सरनाईक यांनी केला आहे. तसेच, अतिरिक्त आयुक्त राजपूत दीर्घ सुट्टीवर गेल्याचाही उल्लेख त्यांच्या पत्रात केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर सदर प्रकरणाची चौकशी होईल, तसेच दोषी आढळणार्या संबंधित अधिकारी व व्यक्तींवर तातडीने योग्य ती प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि त्याला कालमर्यादा ठेवून तातडीने चौकशी पूर्ण केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले आहे.
Political Interference in Voter Lists With Help of Government Officials, Alleges Minister Pratap Sarnaik
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar : तिसऱ्या क्रमांकावर गेल्याने अजित पवारांची खेळी, काँग्रेसशी हातमिळवणीचा प्रयत्न
- मुंढवा भूखंड घोटाळा, शितल तेजवानी यांच्या पॉवर ऑफ अटॉर्नीवर पार्थ पवार यांच्या सह्या
- Rohit Pawar : धर्मनिरपेक्ष आणि समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसची भाजपला मदत, रोहित पवार यांचा बी-टीम म्हणत काँग्रेसवर निशाणा
- Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गट – मनसे युतीची घोषणा वाजत गाजत, संजय राऊत म्हणाले नाटक नसून प्रीतीसंगम