विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raosaheb Danve उद्धव ठाकरेंसारखा काळा बुरखा घालून किंवा शेपूट घालून मी विधानपरिषदेत गेलो नाही. मी सात वेळा जनतेतून निवडून आलो आहे. समोरून डरकाळी फोडत विधानसभेत आणि लोकसभेत जाणारा मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही, असा पलटवार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे.Raosaheb Danve
राज्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीची घोषणा झाल्यानंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दानवेंची खिल्ली उडवली होती. त्याला उत्तर देताना दानवे म्हणाले, मी या पक्षात जनता पार्टीच्या काळापासून निष्ठेने काम करत आहे. पक्षाने मला सभापती, आमदार, खासदार, दोनदा केंद्रात मंत्री आणि राज्याचा अध्यक्षही केले.Raosaheb Danve
दोन्ही पक्षांच्या निवडणूक कामगिरीवर बोट ठेवताना रावसाहेब दानवे यांनी आकडेवारीच सादर केली. मी वर्तवलेले भविष्य खरे ठरले आहे. प्रचारादरम्यान मला परिस्थिती समजत होती, म्हणूनच मी म्हणालो होतो की निवडणुकीनंतर यांचा पक्ष राहणार नाही. अखेर झाले काय? एकाचे 9 आमदार आले आणि एकाचे 7. साधी दोन अंकी संख्याही त्यांना गाठता आली नाही. मग त्यांना माझे बोलणे झोंबायचे कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता दानवे यांनी सावध पवित्रा घेतला. दोन्ही भावांवर एकाच वेळी टीका करायला नको. राज साहेबांना सध्या ‘वेटिंग’वर ठेवा. उद्या ते काय बोलतात ते पाहू आणि मगच त्यांना उत्तर देऊ, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंवरील तोफ तूर्तास राखून ठेवली आहे.
भोकरदनमधील भाजपच्या पराभवावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचाही दानवेंनी समाचार घेतला. भोकरदनचे सामाजिक समीकरण वेगळे आहे. जे लोक आमच्याकडून तुमच्याकडे गेले, त्यांनीच तुमचा सत्यनाश केला. त्यांच्या नादी लागल्यामुळेच तुमचा आकडा नऊवर आला आहे, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला.
I am a real tiger going to the Lok Sabha, not a paper tiger like them, Raosaheb Danve’s counterattack
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray : अचानक बडव्यांशी हातमिळवणी कशी केली? आशिष शेलार यांचा राज ठाकरे यांना सवाल
- बेकायदेशीर ऊस गाळप प्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या साखर कारखान्याला ₹११ कोटींचा दंड
- मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणाऱ्यांचा राजकीय खात्मा करणार, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबाेल
- जणू रशिया आणि युक्रेनची युती! ठाकरे बंधूंची खिल्ली उडवत देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांना टाेला