Navi Mumbai International : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून प्रवासी सेवा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Navi Mumbai International बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून प्रवासी सेवा अधिकृतरीत्या सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी या विमानतळावरून ३० विमानांची रेलचेल असणार असून सुमारे ४ हजार प्रवासी या सुविधेचा लाभ घेणार आहेत. या विमानतळाच्या कार्यान्वित होण्यामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार ७० टक्क्यांनी कमी होणार आहे. Navi Mumbai International

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर २०२५ रोजी या विमानतळाचे उद्घाटन झाले होते. आजच्या पहिल्या टप्प्यात देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर आणि स्टार एअर या कंपन्या आपली सेवा देणार आहेत. पुढील १५ दिवसांत विमानांची ही संख्या दररोज ४८ पर्यंत वाढवण्यात येणार आहे. तसेच, येत्या मार्च २०२६ पासून येथून आंतरराष्ट्रीय विमान सेवा देखील सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. Navi Mumbai International



जगातील सर्वांत व्यस्त विमानतळ होण्याचा अंदाज

सध्या या विमानतळावर दोन धावपट्ट्या कार्यरत आहेत. मात्र, भविष्यात तिसरी धावपट्टी उभारण्याचे नियोजन आहे. तिसरी धावपट्टी पूर्ण झाल्यानंतर, नवी मुंबई विमानतळ हे जगातील सर्वांत जास्त प्रवाशांची वर्दळ असलेले विमानतळ म्हणून नावारूपाला येईल. पहिल्या टप्प्यात वर्षाला सुमारे २ कोटी प्रवासी येथून प्रवास करतील, असा अंदाज आहे.

आता प्रत्यक्ष सेवा सुरू होत असताना, सुरुवातीच्या काळात हे विमानतळ सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासांच्या कालावधीत कार्यरत राहील. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ पासून हे विमानतळ २४ तास सुरू करण्यात येईल.विमानतळ एकूण ११६० हेक्टरवर पसरलेले असून, याच्या उभारणीसाठी १ लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे.

Passenger services from Navi Mumbai International Airport from today

महत्वाच्या बातम्या