विशेष प्रतिनिधी
पुणे : BJP leaders agree पुणे महापालिकेसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कोअर कमिटीची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत जवळपास १०० जणांच्या नावाच्या यादीवर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर ३० ते ३५ नावांवर एकमत झालेले नाही. रात्री उशिरा पर्यंत ही बैठक चालू होती. एकमत न झालेल्या नावांची यादी प्रदेश पातळीवरील वरिष्ठांकडे पाठवली जाणार आहे. तर जी नावे मान्य करण्यात आली आहे ती यादी देखील कोअर कमिटी प्रदेश कार्यालयाला गुरुवारी पाठवणार असून ही यादी शुक्रवारी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.BJP leaders agree
महापालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. भाजपमार्फत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यासंदर्भात बुधवारी एका बड्या हॉटेलमध्ये बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय राज्य मंत्री व खासदार मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य मंत्री माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धिरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बीडकर, आमदार सुनील कांबळे, भीमराव तापकीर आदी उपस्थित होते.BJP leaders agree
या बैठकीत विधानसभानिहाय प्रभागांवर चर्चा झाली. संबधित मतदारसंघातील आमदार व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रभागनिहाय उमेदवारांची नावे मांडण्यात आली. ज्या नावांवर सर्वानुमते निर्णय झाला, त्यावर शिक्कामोर्तब करून पहिली यादी तयार करण्यात आली. तर ज्या नावांवर मतभेद होते, त्या नावांवरील अंतिम निर्णय प्रदेश नेते घेतील, असे ठरविण्यात आल्याचे समजते.
भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी तब्बल अडीच हजार इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. या सर्व अडीच हजार इच्छुकांच्या मुलाखती देखील पार पडल्या आहेत. यातील निवडून येणाऱ्या तब्बल १२५ जणांची यादी भाजपने तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत जवळपास १०० नावांवर एकमत होऊन त्यावर शिक्कामोर्तब झाले. ३० ते ३५ जणांची नावे अंतिम करण्यासाठी कोअर कमिटीतीत दुमत असल्याने त्यांची नावे मुंबईतील प्रदेश कोअर कमिटीला पाठवली जाणार आहे. या नावावर पक्षाचे वरिष्ठ अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते. तर ज्या नावावर एकमत झाले आहे, ती यादी देखील प्रदेश कोअर कमिटीला पाठवण्यात येणार असून त्यांची नावे अंतिम करून ती यादी शुक्रवारी जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर उर्वरित नावांवर चर्चा करून दुसरी यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती भाजपमधील वरिष्ठांकडून देण्यात आली.
भाजप आणि शिवसेना (शिंदे) युतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शिवसेना (शिंदे) पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चाही झाली. या चर्चेत महापालिकेत ३४ जागांची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. मात्र, इतक्या जागांना तयार नसल्याचे भाजपने स्पष्ट केले असून, भाजपने केवळ १६ जागा देण्याची तयारी दाखविल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. जागावाटपावर तोडगा न निघाल्याने अखेर हा निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांवर सोपविण्यात आला आहे.
BJP leaders agree on 100 seats; confusion on 40 to 50 names
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray : अचानक बडव्यांशी हातमिळवणी कशी केली? आशिष शेलार यांचा राज ठाकरे यांना सवाल
- बेकायदेशीर ऊस गाळप प्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या साखर कारखान्याला ₹११ कोटींचा दंड
- मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणाऱ्यांचा राजकीय खात्मा करणार, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबाेल
- जणू रशिया आणि युक्रेनची युती! ठाकरे बंधूंची खिल्ली उडवत देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांना टाेला