विशेष प्रतिनिधी
मुंबई : दोन भावांच्या ‘एकत्र येण्याचा आनंद’ म्हणून जो भावनिक महापूर दाखवला जातोय, तो ओसरल्यानंतर वास्तवातला मतांचा दुष्काळ दिसणारच आहे. कारण राजकारणात घोषणा नाही, आकडेवारी बोलते. निव्वळ भावना मतपेटी भरत नाहीत. दोन शून्यांची बेरीज शून्याएवढीच असते, असा हल्लाबोल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी मंगळवारी मनसे व ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. तूर्त ही युती मुंबई महापालिकेसाठी झाल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने ठाकरे गट व मनसेच्या युतीला शून्याची उपमा दिली आहे. मनसे व ठाकरे गटाच्या युतीचा आपल्याला मतांच्या राजकारणाला कोणताही फटका बसणार नसल्याचा दावा केला आहे.
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, मनसे – उबाठा युती म्हणजे, आषाढीच्या घरी महाशिवरात्र! किंवा ग्रामीण म्हणीत सांगायचं तर – उघड्याशेजारी दुसरा उघडं गेल, रातभर थंडीने काकडून मेल…
दोन भावांच्या ‘एकत्र येण्याचा आनंद’ म्हणून जो भावनिक महापूर दाखवला जातोय, तो ओसरल्यानंतर वास्तवातला मतांचा दुष्काळ दिसणारच आहे. कारण राजकारणात घोषणा नाही, आकडेवारी बोलते. निव्वळ भावना मतपेटी भरत नाहीत. थोडं वास्तव पाहूया… फक्त मुंबईची आकडेवारी.
गेल्या तीन विधानसभा निवडणुकांत भाजपा मुंबईत क्रमांक १ चा पक्ष आहे. सर्वाधिक आमदार भाजपाचे निवडून येतात
लोकसभेत भाजपा–सेना युती विरुद्ध उबाठा–मविआ अशी लढत होती.
भाजपने काय मांडले मतांचे गणित?
मुंबईत भाजपा, मते – 15,30,853
शिवसेना, मते – 11,43,380
महायुतीची एकत्रित मते – 26,74,233
उबाठा – 16,94,326
कॉंग्रेस – 7,68,083
मविआची एकत्रित मते – 24,62,409
विधानसभा 2025 मध्ये मनसे स्वतंत्र लढली.
भाजपा – 18,90,931
शिवसेना – 10,09,083
महायुती – 29,00,020
उबाठा – 13,95,303
कॉंग्रेस – 6,82,532
मविआ – 20,77,835
मनसे – 4,10,735
आता हिशोब सरळ आहे.
उबाठा + मनसे = 18,02,678
The sum of two zeros equals zero, BJP attacks Raj-Uddhav alliance
महत्वाच्या बातम्या
- सातारा ड्रग्स कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्या, हर्षवर्धन सपकाळ
- संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटविण्याची मागणी
- बांगलादेशात युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर प्रचंड असंतोष, देशभर आंदोलन; ढाकामध्ये जाळपोळ
- विधानसभा निवडणुकीत आघाडीचा टांगा पलटला, आता महापालिकेत घोडेही फरार, एकनाथ शिंदेंचा टोला