विशेष प्रतिनिधी
नागपूर : Nagpur Municipal राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर शहरात भाजपने सर्व महत्त्वपूर्ण पदांवर महिलांची नियुक्ती करत एक नवा इतिहास रचला आहे. यामुळे नागपूर महानगरपालिकेत आता खऱ्या अर्थाने ‘महिलाराज’ अवतरले आहे. राज्यातील आणि देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे.Nagpur Municipal
नागपूर महानगरपालिकेच्या सर्व महत्त्वाच्या समित्यांवर महिला नगरसेविकांची नियुक्ती करून भाजपने ‘मातृशक्तीचा सन्मान’ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निवडीमुळे महापौर नीता ठाकरे आणि नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांचे हे सक्षम नेतृत्व आता पूर्णतः सज्ज झाले आहे.Nagpur Municipal
नागपूर महापालिकेच्या 151 जागांपैकी 108 जागांसह भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांना हे धाडसी निर्णय घेणे सोपे झाले आहे. याउलट, विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसकडे 29 जागा असून बहुजन समाज पक्षाचे 10, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आणि एका अपक्ष उमेदवाराचा यामध्ये समावेश आहे.
नागपूर महानगरपालिकेत महिला राज
महापौर – नीता ठाकरे
उप महापौर – लीला हात्तीबेड
स्थायी समिती – शिवानी दाणी
परिवहन – मंगला खेकरे
स्थापत्य – अश्विनी जिचकार
अग्निशमन – मायाताई इवनाते
आरोग्य – मनीषा अतकरे
विधी – निधी तेलगोटे
शिक्षण – संतोषदेवी लड्डा
गल्लीच वस्ती निर्मूलन – ऋतिक मसराम
क्रीडा -दर्शनी धवड
महिला व बालकल्याण – सारिखा नांदुरकर
जलप्रदाय – दिव्या धूरडे
कर आकारणी -सरिता कावरे
‘Women Take Charge’ in Nagpur Municipal Corporation; BJP Scripts New History
महत्वाच्या बातम्या
- विधानसभेत 11,995.33 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; महसुली तूट आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न
- गाेल्डन अवरमध्ये सायबर फ्राॅडची तक्रार आल्यास पैसे रिकव्हर, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
- पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांची कारवाई; इमारतीवरून उडी मारल्यानंतर महिलेचा मृत्यू
- contractor’s agitation तब्बल ७७ हजार कोटी रुपयांची देयके अद्याप प्रलंबित, कंत्राटदार आंदोलनाच्या पावित्र्यात