निवडणुकीपूर्वी जय भीम, नंतर फक्त जय मीम : नीतेश राणे यांचा महापालिकेतील नमाज पठणावर हल्लाबाेल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी हे पक्ष जय भीम-जय मीम म्हणतात पण निवडणुकीनंतर फक्त जय मीमच राहते ते आमच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विसरतात. संविधानाच्या कुठल्या पानावर मनपामध्ये नमाज पठण परवानगी आहे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानात कुठे परवानगी आहे याचे कागद त्यांनी मला दाखवावे, असा सवाल करत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी मालेगाव मनपामध्ये नमाज पठणावर टीका केली आहे. Nitesh Rane

नीतेश राणे म्हणाले की, मनपामध्ये तुम्ही विकास करण्यासाठी निवडून गेले आहात की धर्म वाढवण्यासाठी निवडून गेलेले आहात? असा सवाल राणेंनी केला आहे. हे जिहाद नाही का? याचाच विरोध आम्ही करतो आहोत. लोकांनी तुम्हाला विकासासाठी निवडून दिले आहे ना? नमाज पडण्यासाठी तुमच्या मशिदी बंद पडल्या आहेत का? तिथे टाळे लावले आहेत का? मग उद्या आम्ही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये प्रत्येक मनपामध्ये भगवतगीता वाचायला सुरुवात करतो ना. मग हिरव्या सापांनी थोबाड उघडू नये. तुम्ही केले तर चालते आणि आम्ही केले तर देखो ये हिंदू-मुस्लीम करतात म्हणायचे. याचे सिलेंडर शुक्रवारीपण वर वर येणार आणि रोज पण येणार हे कुठे लिहले आहे.



माझ्या जिल्ह्यातील लहान मुलांना मारण्याचा जो व्हिडिओ समोर आला आहे ना त्या मुल्ला मोलवीचे काय होते ते बघा. मी पालकमंत्री आहे ना त्यांना असे धडे शिकवीण परत हात कापतील उदाहरण देईन. मदरसे पाहिजे कशाला हे आंतकवादीचे अड्डे आहेत, हे आंतकवादी घडवतात. कुठल्या इस्लामिक राष्ट्रामध्ये असे मदरशा सारख्या शाळा सुरू केल्या आणि तिथे भगवतगीता शिकवायला सुरू केले तर आम्हाला परवानगी आहे का? आम्ही का मदरशाचे लाड करायचे.

तिथे कधी मुलांना मारले जाते कधी हत्यार भेटतात. मशिदीत कुराण शिकवा ना, त्यासाठी मदरसे कशाला हवेत. महाराष्ट्रातील सर्व मदरसे बंद करावे ते आंतकवादी अड्डे आहेत, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. वेगळे अड्डे चालवण्याची गरज काय? असा सवाल राणे यांनी केला.

Before elections, Jai Bhim, after that only Jai Meem: Nitesh Rane attacks Namaz in Municipal Corporation

महत्वाच्या बातम्या