विशेष प्रतिनिधी
बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत हा निव्वळ अपघात आहे की कट रचलेला घातपात, हे स्पष्ट होणार नाही. जनतेला या प्रश्नांची उत्तरे मिळणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी अजितदादांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी केली आहे.Yugendra Pawar
अजितदादांच्या मृत्यूनंतर आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेत विमान अपघात प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. १० फेब्रुवारी आणि १८ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या स्वतंत्र पत्रकार परिषदांमध्ये तांत्रिक पुराव्यांसह काही प्रश्न उपस्थित केले होते. रोहित पवारांनी विमानाचा मार्ग, वेग आणि तांत्रिक स्थिती दर्शवणारे एक प्रेझेन्टेशन सादर केले. विमान कोसळण्यापूर्वी त्यात काही तांत्रिक बिघाड झाला होता की तो जाणीवपूर्वक घडवून आणला होता? याबाबत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.Yugendra Pawar
युगेंद्र पवार यांनीही रोहित पवार यांच्या शंकेला दुजोरा दिला आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मला २८ जानेवारीला सकाळी ८:५५ वाजता फोन आला की दादांच्या विमानाचा अपघात झाला आहे. मला सुरुवातीला वाटले की कदाचित रनवेवरून विमान घसरले असेल किंवा साधे क्रॅश लँडिंग झाले असेल. पण जेव्हा मी तातडीने बारामती विमानतळावर पोहोचलो, तेव्हा चित्र भयावह होते. विमान ५० फूट खाली कोसळले होते आणि पूर्णपणे खाक झाले होते. विमानाचा फक्त मागचा भाग (Tail) दिसत होता, बाकी सर्व काही जळून खाक झाले होते.Yugendra Pawar
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. डीजीसीएने ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ (VSR Ventures) या विमान कंपनीची चार विमाने तातडीने जमिनीवर (Ground) ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीचे पहिले ऑडिट पूर्ण झाले असून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक संकेत मिळत आहेत. यानंतर युगेंद्र पवार यांनी केवळ ४ विमाने नाही, तर चौकशी पूर्ण होईपर्यंत या कंपनीची सर्वच विमाने बंद केली पाहिजेत,” अशी आग्रही मागणी केली आहे.Yugendra Pawar
या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय (CBI) कडे वर्ग करण्यात आला आहे. जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत हा निव्वळ अपघात आहे की कट रचलेला घातपात, हे स्पष्ट होणार नाही. जनतेला या प्रश्नांची उत्तरे मिळणे अत्यंत गरजेचे आहे, असेही युगेंद्र पवारांनी म्हटले.Yugendra Pawar
Accident or Conspiracy? Yugendra Pawar Raises Suspicion Over Ajit Dada’s Plane Crash
महत्वाच्या बातम्या
- विधानसभेत 11,995.33 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; महसुली तूट आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न
- गाेल्डन अवरमध्ये सायबर फ्राॅडची तक्रार आल्यास पैसे रिकव्हर, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
- पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांची कारवाई; इमारतीवरून उडी मारल्यानंतर महिलेचा मृत्यू
- contractor’s agitation तब्बल ७७ हजार कोटी रुपयांची देयके अद्याप प्रलंबित, कंत्राटदार आंदोलनाच्या पावित्र्यात