विशेष प्रतिनिधी
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते, असे विधान केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरात भाजपचे वरिष्ठ नेते सी.आर. पाटील यांनी केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
सुरतमध्ये आयोजित पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संतप्त प्रतिक्रिया व्यक्सt होऊ लागल्या आहेत. CR Patil
आपल्या भाषणात पाटील यांनी म्हटले की, मला सांगताना आनंद होतो की छत्रपती शिवाजी महाराजही पाटीदार समाजाचे होते आणि त्यांनी हिंदू स्वराज्याची स्थापना केली. हे विधान म्हणजे महापुरुषांना समाजाच्या, जातीच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात आहे. महाराजांचा इतिहास सर्वसमावेशक असताना त्यांना एखाद्या समाजापुरते मर्यादित करणे हे धोकादायक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
खासदार संजय राऊत यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा थेट हल्लाबोल केला. महाराजांचा इतिहास बदलण्याचा किंवा त्यांना वेगवेगळ्या समाजांशी जोडण्याचा हा प्रकार महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची वक्तव्ये करून मतदारांना भावनिक मुद्द्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
संभाजी ब्रिगेडचे नेते संतोष शिंदे यांनीही या विधानाचा तीव्र निषेध केला. भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षाचा नेता असो, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत असे वक्तव्य करणे निषेधार्ह आहे, असे ते म्हणाले. महाराज समजून घ्यायचे असतील तर महाराष्ट्रात येऊन गडकोट फिरावेत, त्यांचा इतिहास अभ्यासावा, असा सल्लाही त्यांनी दिला. महाराजांचे विचार आणि कार्य आत्मसात न करता केवळ त्यांच्या नावाचा वापर राजकीय फायद्यासाठी करणे हे दुर्दैवी असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
इतिहास अभ्यासक संजय सोनवणी एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले की, हे विधान पूर्णपणे राजकीय हेतूने करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या समाजाचे होते, हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे. महाराज सर्वांचे होते. मात्र इतिहास सांगतो की ते मराठा होते आणि त्यांनी स्वतः आपल्या पत्रांमधून त्याचा उल्लेख केला आहे. इतिहास स्पष्ट असताना अशा प्रकारची विधाने करणे म्हणजे इतिहासाचे वाचन न केल्याचे द्योतक आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Belonged to Patidar Community’: CR Patil Remark Sparks Outrage in Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut : संजय राऊतांच्या घराबाहेर ‘बॉम्ब’ची धमकी! बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
- ईव्हीएमवरील ईएनडी बटण बंद, मतदानातील गोंधळ टाळण्यासाठी निर्णय
- निष्ठावंत कार्यकर्ते म्हणत मेधा कुलकर्णींची सूचक पोस्ट; म्हणाल्या, ‘कुछ कह गए, कुछ सह गए…’,
- लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात; आरटीआयमधून मोठा गैरप्रकार उघड