विशेष प्रतिनिधी
मुंबई : निवडणूक आयाेगाने आणिबाणीच्या परिस्थितीत वापरण्यासाठी नवीन मशीन आणले आहे. यावरून राज ठाकरे यांनी निवडणूक आयाेगावर टीका केली आहे. ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही?, नवीन मशीन राजकारण्यांना दाखवावंसंही नाही वाटलं. यात गडबड होणार नाही हे कशावरून?, ही कुठली बेबंदशाही सुरू आहे?, ही कसली लोकशाही?, असे सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केले. Raj Thackeray
पत्रकार परिषदेत बाेलतान राज ठाकरे म्हणाले, काय प्रकारचं राजकारण सुरू आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. याबाबत उद्धव ठाकरेंनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. आतापर्यंतच्या निवडणुकामध्ये प्रचार झाल्यानंतर एक दिवसामध्ये वेळ असतो. आतापर्यंत मतदानाच्या आदल्या दिवशी प्रचार नव्हता. निवडणुकीची प्रथा मोडली. सरकारला जे हवं त्यासाठी निवडणूक आयोग काम करतंय. पत्रके वाटू शकत नाही पण पैसे वाटू शकतात का?, ही मुभा आताच का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
निवडणूक आयोग सरकारला जे काही हवं ते करत आहे. दिनेश वाघमारे कशावरही उत्तर द्यायला तयार नाहीत. सरकारला ज्या सुविधा हव्यात त्यासाठी निवडणूक आयोग काम करतंय.
राज ठाकरेंनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की, आपापल्या विभागात लक्ष ठेवा. पैसे वाटप केलं जात आहे. आनंदाची गोष्ट की, काही जण त्याला विरोध करत आहे. निवडणूक आयोग याला मदत करतंय, हा आमचा आरोप आहे,
निवडणूक आयोगाने आता एक PADU नावाचं नवीन मशीन आणलं आहे. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट (PADU) मशीन असं त्याचे नाव आहे. ते उद्या सगळीकडे ठेवलं जाणार आहे. ईव्हीएम बंद पडलं, तर हे मशीन वापरलं जाणार आहे. नवी मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही. अपवादात्मक (इमरजेंसी) परिस्थितीमध्ये हे PADU मशीन वापरलं जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.
ईव्हीएम मशीनला बॅकअप म्हणूण हे मशीन गरज पडली तर वापरलं जाईल. मशीन अचानक बंद झाली किंवा तांत्रिक अडचण आली तर हे मशीन वापरलं जाईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली.
Raj Thackeray says new machines for EVMs are what kind of apathy this is!
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन