Fadnavis : ‘देवानेच ठरवलंय, महायुतीचाच महापौर’ फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला; शिंदेंसोबत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट

विशेष प्रतिनिधी

पुणे : Fadnavis  मुंबई महापालिकेच्या महापौरपदावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिश्किल पण बोचरा टोला लगावला आहे. “देवाच्या मनात असेल तर मुंबई आपली होईल,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “वरच्या देवाने ठरवले आहे की महायुतीचाच महापौर होणार आहे.”Fadnavis

पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मुंबईचा महापौर कोण होणार, निवड कधी होणार आणि कार्यकाळाचा फॉर्म्युला काय असेल, हे सर्व निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेतृत्व एकत्र बसून घेतील. “या प्रक्रियेत कोणताही वाद होणार नाही. आम्ही दोन्ही पक्ष मिळून मुंबई सुरळीत चालवून दाखवू,” असेही त्यांनी सांगितले.
२५ वर्षांनंतर ठाकरे कुटुंबाची सत्ता संपुष्टातFadnavis



मुंबई महानगरपालिकेवर तब्बल २५ वर्षांनंतर ठाकरे कुटुंबाची एकहाती सत्ता संपुष्टात आली असून, भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने २२७ जागांच्या सभागृहात ११८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. बहुमताचा आकडा ११४ असताना महायुतीने तो सहज पार केल्यामुळे आता मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

संजय राऊतांवर अप्रत्यक्ष टोला

यावेळी फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यांवरही अप्रत्यक्ष टीका केली. “काही लोक म्हणतात, गिरा तो क्या हुआ, टांग तो ऊपर थी. अशा वक्तव्यांना उत्तर देण्याची गरज नसते,” असे म्हणत त्यांनी भाजपने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढल्याचा दावा केला.

शिवसेना शिंदे गटाच्या कामगिरीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, काही जागा अत्यंत कमी मतांनी गेल्या. “मुंबईत पहिल्यांदाच अशा प्रकारे निवडणूक लढवूनही शिंदे गटाला अपेक्षेप्रमाणे चांगले यश मिळाले आहे,” असे त्यांनी नमूद केले.

फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही ‘या निवडणुकीतील बिगेस्ट लूझर’ ठरवले. ठाकरे बंधूंच्या युतीचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला, मात्र राज ठाकरेंना काहीच मिळाले नाही, असा टोला त्यांनी लगावला.

कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिल्याबाबत फडणवीस म्हणाले की, पवार यांनी आधीच राज्यपालांसोबत नियोजित भेट असल्याचे कळवले होते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीला राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘God Has Decided, Mahayuti Mayor’ Fadnavis Quips at Thackeray

महत्वाच्या बातम्या