विशेष प्रतिनिधी
अमरावती: Navneet Rana भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करून, “बाबा सिद्दिकी यांच्यासारखीच तुमची हत्या करू,” अशी धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.Navneet Rana
या गंभीर प्रकरणी अमरावतीतील राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नवनीत राणा यांचे खासगी स्वीय सहाय्यक सचिन सोनोने यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.Navneet Rana
विशेष म्हणजे, नवनीत राणा यांना यापूर्वीही अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. हिंदू शेरणी अशी ओळख आणि निवडणूक प्रचारादरम्यान हैदराबादमध्ये दिलेल्या भाषणानंतर त्यांना धमकी मिळाली होती. आता पुन्हा फोनवरून धमकी आल्याने अमरावती जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत अमरावतीमध्ये भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या गटाला मोठे यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नवनीत राणा यांच्यावर केलेली टीका देखील चर्चेत होती. त्यानंतरच धमकीचा हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, यापूर्वीही हैदराबाद येथील अब्दुल नावाच्या व्यक्तीने पत्राद्वारे घाणेरड्या शब्दांत धमकी दिल्याची घटना घडली होती. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातही धमकीची पत्रे आल्याने त्या वेळीही पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या ताज्या धमकीनंतर पोलिसांनी सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क केल्या असून, धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.
“Will Kill You Like Baba Siddique”: Navneet Rana Receives Death Threat
महत्वाच्या बातम्या
- Shinde Sena : काेल्हापुरातही शिंदेसेनेचा महापाैरपदावर डाेळा, काॅंग्रेससाेबत एकत्र येण्याची तयारी?
- डाॅ. संग्राम पाटील यांची मुंबई विमानतळावर पुन्हा चौकशी
- Shiv Sena : शिवसेना काेणाची, धनुष्यबाण काेणाच्या हातात: बुधवारपासून सर्वाेच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
- महापौर पदाच्या आरक्षणाची साेडत 22 जानेवारीला