Congress : भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीची एमआयएमशी हातमिळवणी

विशेष प्रतिनिधी

Congress  अकोला महानगरपालिकेत 38 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, बहुमतासाठी आवश्यक असलेला 41 चा आकडा गाठण्यापूर्वीच त्यांना रोखण्यासाठी शहरात ‘हाय व्होल्टेज’ राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.Congress

कॉंग्रेसचे आमदार साजिद खान आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात बंद दाराआड महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये एमआयएम आणि दोन्ही राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, 21 नगरसेवक असलेल्या काँग्रेसने भाजपला रोखण्यासाठी मोठी तडजोड करण्याची तयारी दर्शवली आहे. आम्हाला सत्तेत कोणतेही पद नको, मात्र भाजपेतर सत्ता स्थापन व्हावी, असा स्पष्ट प्रस्ताव काँग्रेसने ठाकरे गटासमोर आणि इतर मित्रपक्षांसमोर ठेवला आहे. विरोधकांच्या या संभाव्य मोर्चेबांधणीमुळे अकोल्यात भाजपची सत्तास्थापनेची वाट बिकट होण्याची चिन्हे दिसत आहेत.Congress



अकोला महानगरपालिकेत सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी सध्या राजकीय पेच निर्माण झाला असून ‘वंचित’ आणि ठाकरे गट आता ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आले आहेत. 80 सदस्यीय महापालिकेत बहुमत गाठण्यासाठी 41 जागांची आवश्यकता असताना, 38 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, त्यांना बहुमतापासून रोखण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली असून आमदार साजिद खान पठाण यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या उभय नेत्यांमध्ये तब्बल 45 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली, ज्यामध्ये 5 नगरसेवक असलेल्या वंचितचा पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेसने विनंती केली आहे.

भाजपने सत्ता स्थापनेसाठी 6 नगरसेवक असलेल्या ठाकरे गटाला आधीच ‘ऑफर’ दिली होती, ज्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसनेही ठाकरे गटासमोर मोठा प्रस्ताव ठेवला आहे. 21 जागा असलेली काँग्रेस आता प्रकाश आंबेडकरांच्या साथीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अकोल्यात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने, आता वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट नेमकी कोणाची पाठराखण करणार, यावर अकोला महापालिकेच्या सत्तेचे भवितव्य अवलंबून आहे.

Congress, Both NCP Factions Join Hands With AIMIM to Keep BJP Out

महत्वाच्या बातम्या