विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा आणि मुंबईत शिवसेनेचा महापौर करावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी त्यांना हीच खरी श्रद्धांजली असेल, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. Bhaskar Jadhav
मुंबई महानगरपालिकेत महायुतीला मोठे यश मिळाले असले तरी ठाकरेंची शिवसेना दोन नंबरचा पक्ष ठरला. आता महापौरपदाची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर भास्कर जाधव म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा आणि मुंबईत शिवसेनेचा महापौर करावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्यावर्षी त्यांना हीच खरी श्रद्धांजली असेल. एकनाथ शिंदे यांना मी आवाहन करतो की, त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा देऊन शिवसेनेचा महापौर मुंबईत बसवण्यासाठी मदत करावी.
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील महापौरपदाबाबत मोठे विधान केले होते. देवाची इच्छा असेल तर आपला महापौर बसेल, असे विधान ठाकरे यांनी केले होते. दरम्यान, महापौरपदाबाबत राजकीय वर्तुळात हालचाली सुरु असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
शिवसेना प्रमुखांना श्रद्धांजली वाहणे आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणे हा आजचा दिवस आहे. आज बाळासाहेबांच्या आठवणी जागवण्याचा दिवस आहे, त्यामुळे राज ठाकरे यांनी काय राजकीय पोस्ट केली. त्यावर भाष्य करण्याचा दिवस आज मी समजत नाही. आज फक्त बाळासाहेबांच्या आठवणी जपणे हेच उचित ठरेल, असेही जाधव म्हणाले.
यंदाचे वर्ष हे बाळासाहेब यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे आणि त्याच वर्षी शिवसेनेचा महापौर हा मुंबई महापालिकेवर असणार नाही. याच्यासारखे दु:ख नाही, म्हणून आम्ही बाळासाहेब यांचे विचार पुढे घेऊन जात आहे असे सांगतात त्या सर्वांना मी विनंती करतो की हे बाळासाहेब यांच्या जन्मशताब्दीचे वर्षे आहे. बाळासाहेबांसमोर तुम्ही नतमस्तक होऊ शकता का? असाल तर तुम्ही भाजपाला सांगितले पाहिजे की हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दीचे वर्षे आहे यासाठी आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही उद्धव ठाकरे सांगतील त्या उमेदवाराला महापौरपदासाठी पाठिंबा दिला पाहिजे, असे भास्कर जाधव म्हणाले.
Support Uddhav Thackeray’s Shiv Sainik for the post of Mayor, Bhaskar Jadhav appeals to Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- Ladki Bahin : लाडक्या बहिणींची पुन्हा झाडाझडती, २२ ते २५ लाख महिलांच्या ई केवायसीची तपासणी होणार
- नाद कुणाचाही करा, पण देवाभाऊ यांचा नाही, जयकुमारे गाेरे यांचा अभिजीत पाटलांना इशारा
- नागपुरातील महापौर पदासाठी आरक्षणात घोळ, विजय वडेट्टीवार यांचा आरोप
- कामटी जि.प. गटावरून वाद पेटला; सकल मराठा समाजाची आक्रमक भूमिका!