विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी: शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते अंबादास दानवे हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. दानवे यांची आमच्याकडे येण्याची ‘प्रोसेस’ सुरू झाली आहे, असे सामंत यांनी सांगितले. Ambadas Danve
उदय सामंत म्हणाले, “दानवे यांच्या टीकेला मीडियाने फारसे गांभीर्य देऊ नये. आपल्या नेत्यांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी ते अशी विधाने करत असतात. मात्र, पडद्यामागे त्यांच्या पक्षप्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच ते आमच्यासोबत दिसतील. उबाठा’चे नेतृत्व सक्षम नसल्यामुळेच निवडून आलेले नगरसेवक पक्ष सोडून जात आहेत. दानवे देखील याच वाटेवर आहेत.”
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा दावा साफ फेटाळून लावला. अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी कधीही पक्ष बदलले नाहीत. ते आमचे सहकारी आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी उदय सामंत यांच्या वक्तव्याला कोणताही अर्थ नसल्याचे सांगितले. उलट, उदय सामंत हे स्वतः एका मोठ्या गटासह भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. दावोसमध्ये काय चर्चा झाली, हे तुम्हाला माहिती आहे का? असा पलटवारही राऊतांनी केला.
Ambadas Danve to Join Shinde Sena Soon, Claims Uday Samant
महत्वाच्या बातम्या
- कोणताही रंग कुणाच्या बापाचा नाही, सयाजी शिंदे यांची मुंब्रा हिरवा करण्यावर संतप्त प्रतिक्रिया
- भाजपने परवानगी दिली तर शिंदे गटाचे नामोनिशाण मिटवून टाकेन, गणेश नाईक यांचा इशारा
- ‘आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही?’ महिला कर्मचाऱ्याचा गिरीश महाजनांना थेट सवाल!
- आता महाराष्ट्र थांबणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास