बारामतीत विमान अपघातात अजित पवार यांचे निधन, विमानातील अन्य तिघांचाही मृत्यू

विशेष प्रतिनिधी

बारामती : बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार येथे निधन झाले. बारामती येथील विमानतळावर लँडिंगदरम्यान ही घटना घडली. या अपघातात अजित पवार यांच्यासह 3 सणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज (बुधवारी) बारामती दौऱ्यावर होते. आज दिवसभरात त्यांच्या चार महत्त्वाच्या सभा नियोजित होत्या. याचसाठी ते सकाळी विमानाने बारामतीला पोहोचले. मात्र, विमानतळावर लँडिंग करत असतानाच हा विमानाचा अपघात झाला. यावेळी विमानामध्ये अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पीए आणि इतर सहकारी होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार यांच्या पत्नी राज्यसभा सदस्य सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील सर्व सदस्य बारामतीकडे रवाना झाले आहेत.

Ajit Pawar dies in plane crash in Baramati, three others on board also die

महत्वाच्या बातम्या