बारामतीत आज सायंकाळी अजितदादांवर अंत्यसंस्कार; राज्यात शासकीय सुटी आणि तीन दिवसांचा दुखवटा

विशेष प्रतिनिधी

बारामती : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या आकस्मिक निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून, सरकारने आज राज्यभर शासकीय सुटी जाहीर केली आहे. तसेच तीन दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. Ajit Pawar

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम तत्काळ रद्द केले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ते थोड्याच वेळात बारामतीकडे रवाना होत आहेत. मंत्रिमंडळातील सदस्य, विविध पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित राहणार आहेत.



राज्य सरकारकडून अंत्यसंस्कारासाठी शासकीय सन्मान देण्यात येणार असून, सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. बारामती आणि परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अजित पवार यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. विविध पक्षांचे नेते, संघटना आणि सामान्य नागरिक श्रद्धांजली अर्पण करत आहेत. तीन दिवसांच्या दुखवट्यादरम्यान शासकीय कार्यक्रम, मनोरंजनात्मक उपक्रम स्थगित ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Ajit Pawar’s Last Rites in Baramati This Evening

महत्वाच्या बातम्या