PM’s Self-Reliance : स्वदेशीचा संकल्प करा विकसित भारताचे स्वप्न पाहा,परीक्षा पे चर्चामध्ये पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेचा मंत्र

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : PM’s Self-Reliance पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या 9व्या आवृत्तीत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत स्वदेशी, आत्मनिर्भरता आणि विकसित भारत यावर भर दिला. दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी आयोजित या संवादात मोदींनी प्रथम विद्यार्थ्यांचे स्वागत करताना त्यांना आसामचे गमछे परिधान केले आणि भारताच्या विविधतेचे महत्त्व अधोरेखित केले.PM’s Self-Reliance

मोदी म्हणाले की, “एक वर्षात प्रत्येक नागरिकाने एक तरी विदेशी वस्तू स्वदेशीने बदलण्याचा संकल्प करावा. छोट्या सवयींमधूनच मोठा बदल घडतो, असे सांगत त्यांनी स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.PM’s Self-Reliance



ना सांगितले की, 2047 मध्ये भारत विकसित राष्ट्र होईल, तेव्हा आजचे विद्यार्थी 39-40 वर्षांचे असतील. “तेव्हा देश कसा असावा, यासाठी आजपासूनच तुम्हाला स्वप्न पाहावे लागेल आणि त्यासाठी काम करावे लागेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यलढ्यातील बलिदानांची आठवण करून देत त्यांनी भगतसिंग यांचे उदाहरण दिले.

परीक्षेतील तणावावर भाष्य करताना मोदींनी फक्त मार्क्सच्या मागे धावण्याची मानसिकता धोकादायक असल्याचे सांगितले. “गेल्या वर्षीचे टॉप 10 कोण होते, हे फार कमी लोकांना आठवते. पण जीवनात कौशल्य, आत्मविश्वास आणि शिकण्याची जिज्ञासा महत्त्वाची असते,” असे ते म्हणाले.

गोव्याच्या एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी गेमिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी भारतीय कथा आणि संस्कृतीचा वापर करण्याचा सल्ला दिला. पंचतंत्र, अभिमन्यू, महाभारत यांसारख्या कथांवर आधारित गेम तयार करून स्वतःचे डिजिटल व्यासपीठ उभे करण्याचे त्यांनी सुचवले.

मोदींनी विद्यार्थ्यांना अपयशाची भीती न बाळगता स्वतःवर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. “तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे. भारताला पुढे नेण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

Take the Swadeshi Pledge, Dream of a Developed India: PM’s Self-Reliance Message to Students at Pariksha Pe Charcha

महत्वाच्या बातम्या