विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मोठी शिस्तभंगाची कारवाई केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करत निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांवर सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही कारवाई तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी माध्यमांना दिली. Dheeraj Ghate. BJP
महानगरपालिका निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेत अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अर्ज दाखल करणाऱ्या आणि प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची गंभीर दखल पक्षाने घेतली आहे. पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा ठाम निर्धार भाजपने व्यक्त केला आहे. पक्षाच्या धोरणांविरोधात जाऊन स्वतंत्रपणे निवडणूक लढविणे हा शिस्तभंगाचा प्रकार असून अशा वर्तनामुळे पक्षसंघटनेला धक्का बसतो, असे मतही पक्षनेतृत्वाने व्यक्त केले आहे. Dheeraj Ghate. BJP
धीरज घाटे यांनी स्पष्ट केले की, पक्ष हा संघटनशक्तीवर उभा आहे आणि प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने पक्षाच्या अधिकृत निर्णयांचे पालन करणे अपेक्षित आहे. भविष्यातही कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या कारवाईमुळे पक्षातील शिस्त अधिक बळकट होईल आणि संघटनात्मक एकात्मता टिकवून ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे. आगामी काळात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही संकेत मिळत आहेत. Dheeraj Ghate. BJP
Major Action by BJP Against Rebels in Pune; Suspended for 6 Years,Information shared by City President Dheeraj Ghate.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेना (उबाठा) च्या भुमिकेप्रमाणे परभणीत काँग्रेसने वागायचे का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला शिकवा, राज ठाकरे यांचे सरसंघचालकांना आव्हान
- राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला
- उबाठा गट हा शून्यात हरवलेला पक्ष, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघात