विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासह मनसैनिकांनी हिंदी भाषिकांविरुद्ध केलेल्या कथित द्वेषपूर्ण भाषणांचा तपशील सादर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना दिले आहेत. भडकावू आणि प्रक्षोभक भाषणांप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात फाैजदारी खटला दाखल करण्याबाबत आदेश देण्याची विनंती करणाऱ्या याचिकेची मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गाैतम अंखड यांच्या खंडपीठानं दखल घेतली आहे.Raj Thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अमराठीच्या मुद्यावर प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी याचिका सुनील शुक्ला यांनी हायकोर्टात दाखल केलीय. तसेच मनसेची मान्यता रद्द करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्या, असेही याचिकेत नमूद केलं आहे. या याचिकेवरील सुनावणी घेण्यापूर्वी याचिकाकर्त्यांना याचिकेतून ‘उत्तर भारतीय’ आणि ‘अमराठी भाषिक’ हे शब्द वगळावेत. त्यानंतर याचिकेवर सुनावणी घेण्याबाबत विचार केला जाईल, असे न्यायालयानं खडेबोल सुनावले होते. गेली काही वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे मराठी भाषेच्या मुद्यावरून आक्रमक असून ते सातत्यानं अमराठी भाषिकांना लक्ष्य करत असल्याचं याचिकेत नमूद केलं आहे. राज्यातील उत्तर भारतीय-हिंदी भाषिकांविरुद्ध तसेच वैयक्तिकरित्या शुक्ला यांच्याविरोधात कथित द्वेषपूर्ण भाषणांत चिथावणी देतात. त्यामुळे त्यांच्या पक्षातील पदाधिकारी आणि मनसैनिकांनी हिंदी भाषिकांना धमक्या आणि त्यांच्याबाबत हिंसाचाराच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत चालल्यात, असा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केलीय.Raj Thackeray
महाराष्ट्रात उत्तर भारतीयांच्या समर्थनार्थ सुरू केलेल्या मोहिमेवरून राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी टार्गेट केल्याचा शुक्ला यांचा आरोप आहे. शुक्ला यांनी त्यांच्या राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कातील मसेच्य गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या साल 2024-25 मधील भडकावू भाषणांचा उल्लेख केलाय. मनसेच्या 30 कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालयात घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच आपल्याला जीवे मारण्याची धमकी देणारे संदेश सोशल मीडियावर पोस्ट केले होते, असा दावाही याचिकेतून करण्यात आलाय. तसेच राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे बँका, मॉल आणि इतर ठिकाणी हिंदी भाषिक कर्मचाऱ्यांना मराठी न बोलल्याबद्दल लक्ष्य करण्यात येतंय, असे शुक्लांनी याचिकेत नमूद केलं आहे. त्यामुळे मुंबईसह आसपासच्या परिसरात मराठी विरूद्ध अमराठी वाद निर्माण झाल्याचा आरोप या याचिकेतून नमूद करण्यात आलाय.
High Court Asks Petitioner To Submit Details Of Raj Thackeray’s Alleged Provocative Speeches
महत्वाच्या बातम्या
- व्हीएसआर विमान कंपनीवर अद्याप कारवाई का नाही? राेहित पवार यांचा सवाल
- Shashikant Shinde : विलीनीकरणानंतर अजित पवार करणार हाेते राष्ट्रवादीचे नेतृत्व, शशिकांत शिंदे यांचा दावा
- “तटकरे, पटेल व्हिलन कसे?” हसन मुश्रीफांचा रोहित पवारांना सवाल
- संबंध सिद्ध झाले तर राजीनामा देईन”; एसीबी छाप्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया