विशेष प्रतिनिधी
सोलापूर : Harshvardhan Sapkal कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान याच्याशी केल्याने मराठा ठोक मोर्चा आक्रमक झाला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. मराठा ठोक मोर्चाचे सोलापूर येथील समन्वयक महेश डोंगरे यांनी हे बक्षीस जाहीर केले आहे.Harshvardhan Sapkal
हर्षवर्धन सपकाळ यांच्यामुळेच कॉंग्रेस संपली. त्यांच्या तोंडाला जो कोणी काळे फासेल त्याला एक लाखांचे बक्षीस देणार. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांना मराठा समाज रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशाराही महेश डोंगरे यांनी दिला आहे.Harshvardhan Sapkal
मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता. यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला. त्यानंतर तो फोटो हटवण्यात देखील आता. मात्र, याच वादानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा येथे बोलताना वादग्रस्त विधान केले. टिपू सुलतान यांना देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान त्यांनी केले. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याच प्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केले, असे सपकाळ म्हणाले होते.
वादग्रस्त विधान केल्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर ट्विट करत म्हटले की, माझ्या वक्तव्याची मोडतोड करून ‘ध’ चा ‘मा’ करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप सपकाळ यांनी केलया आहे.
₹1 Lakh Reward Announced for Blackening Harshvardhan Sapkal’s Face
महत्वाच्या बातम्या
- ही तर जिहादी मानसिकता, नीतेश राणेंची सपकाळांवर जोरदार टीका
- पुण्यात काँग्रेस भवनासमोर भाजप – काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर, आंदोलनाला हिंसक वळण, दगडफेक
- Tipu Sultan : टिपू सुलतानची शिवरायांशी तुलना करणे भोवले, हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल
- Rahul Narwekar : त्या घटनेशी माझा काय संबंध? राहुल नार्वेकर यांचे संजय राऊत यांना उत्तर