विशेष प्रतिनिधी
नागपूर: Vijay Wadettiwar दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नव्हे तर 100 टक्के घातपात असल्याचा दावा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. एएआयबी अजित पवारांचे विमान झाडाला धडकून खाली कोसळले अशी तकलादू थेअरी विमान अपघाताविषयी एएआयबीने सादर केलेल्या अहवालात दिली गेली असेल, तर त्यामुळे अजितदादांचा घातपात झाला हे स्पष्ट होते, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथील एका विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर काल या घटनेला 1 महिना पूर्ण झाल्यानंतर एएआयबीने (विमान अपघात तपास ब्यूरो) या घटनेशी संबंधित आपला प्राथमिक अहवाल जाहीर केला. या अहवालात अजित पवारांचे विमान प्रथम झाडाला धडकले आणि त्यानंतर खाली कोसळले असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, एएआयबीच्या अहवालात विमान एका झाडाला धडकले आणि खाली कोसळल्याचे नमूद करण्यात आले आहे. ते अशी तकलादू थेअरी देत असतील तर त्यातून स्पष्ट् होते की, अजितदादांचा अपघात नाही, तर घातपात आहे. तब्बल एका महिन्याने असा अहवाल आला. त्यात अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.माझ्या मते हा अहवाल पूर्णतः मॅनेज आहे. हा ठरवून दिलेला अहवाल आहे. हा 100 टक्के अपघात नाही. हा अजितदादांचा घातपातच आहे. सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत. ते विमान हवेतच उलटल्याचे दिसत आहे. त्यानंतर ते धाडकन खाली आपटले. त्यांचे म्हणणे आहे, कोणत्या तरी झाडाला अडकून कोसळले. असा अहवाल पाहिल्यानंतर त्यांना फटके मारले पाहिजेत. हा सत्य लपवण्याचा व दडपण्याचा प्रकार आहे हे या अहवालातून दिसते. या अहवालावर चर्चा झाली व्हावी अशी मागणी आम्ही करू.
एएआयबीने आपल्या 22 पानी अहवालात म्हटले आहे की, बारामती विमानतळावरील कमी दृश्यमानता, व्हीएफआर (Visual Flight Rules) नियमांचे उल्लंघन, एअरफिल्ड अपुऱ्या सुविधा, स्वतंत्र MET सुविधेचा अभाव यामुळे ही विमान दुर्घटना घडली. विशेषतः अपघातावेळी हे विमान अगोदर झाडांवर कोसळले. त्यानंतर ते खाली पडून त्याला आग लागली, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अजित पवारांच्या विमानाने लँडिंगच्या पहिल्या प्रयत्नानंतर गो अराऊंड केले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ते धावपट्टीच्या डाव्या बाजूला 50 मीटर अंतरावर कोसळले. अपघाताच्या काही क्षणापूर्वी कॉकपिटमधून ‘ओह शिट’ असा आवाज आला, असेही हा अहवाल सांगतो.
Ajit Pawar’s Crash Was 100% Sabotage, Not an Accident, Claims Vijay Wadettiwar
महत्वाच्या बातम्या
- Israeli missile : इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले
- जागतिक स्तरावरील संस्थांची मदत घ्या पण शंकांचे निरसन करा, सुनील तटकरे यांची विमान अपघाताबाबत मागणी
- पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगला उपस्थित न राहिल्याने आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन
- Amol Mitkari : त्यांचे काका गेलेत, त्यामुळे स्टंट म्हणू नका, रोहित पवारांच्या मदतीला अमोल मिटकरी