‘Eknath Shinde : एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा:दुबईत अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत दिला धीर, मदतीसाठी सरकार सरसावले

विशेष प्रतिनिधी

‘Eknath Shinde  इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यात युद्धाचा भडका उडाल्याने राज्यातील नागरिक हे दुबईत अडकून पडले आहेत. या नागरिकांना शक्य ती मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.‘Eknath Shinde

या युद्धामुळे ठाणे, मुरबाड, पुणे, अहिल्यानगर अशा विविध भागातून दुबईला गेलेल्या नागरिकांनी मदतीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांना संपर्क केला. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टेडीजच्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता. या महाविद्यालयाचे 84 विद्यार्थी सध्या दुबईत अडकून पडले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दुबईतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे डॉ. संजीव पैठणकर आणि सोमनाथ पाटील यांच्या मदतीने या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी त्यांना धीर दिला. या कठीण परिस्थितीत हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असून तुम्हाला सुखरूपपणे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न नक्की केले जातील असे शिंदे यांनी सांगितले.‘Eknath Shinde



तिथे अडकलेल्या इतर नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. आपण कोणतीही चिंता करून नका, जिथे आहात तिथे आपल्याला काही कमी पडू नये यासाठी शक्य ती सारी मदत देण्याचे प्रयत्न बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी त्यांना सांगितले.

तसेच महाराष्ट्र शासन आणि उपमुख्यमंत्री म्हणून हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असून तुम्हाला सुखरूपपणे मायदेशी परत आणण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न केले जातील असे सांगून शिंदे यांनी या नागरिकांना आश्वस्त केले.

‘Eknath Shinde Stands Firmly Behind You’: Deputy CM Reassures Stranded Students in Dubai, Government Steps In to Help

महत्वाच्या बातम्या