Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना कृषी विभागातील कथित घोटाळा प्रकरणात क्लीन चिट

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Dhananjay Munde  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषी विभागातील कथित घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. 2024 मधील कृषी विभागाच्या खरेदी-विक्री व्यवहारांशी संबंधित या प्रकरणात, मुंबई उच्च न्यायालयाने जुलै 2025 मध्येच मुंडे यांना क्लीन चिट दिली होती. या कोणत्याही व्यवहारांमध्ये धनंजय मुंडे यांचा कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांना या आरोपातून मुक्त केले होते.Dhananjay Munde

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लोकायुक्तांकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती. मात्र, आता लोकायुक्तांनीही धनंजय मुंडे यांना दिलासा देत दमानियांची तक्रार फेटाळून लावली आहे. आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात कोणताही निर्णय देऊ शकत नाही, असे स्पष्ट मत नोंदवत लोकायुक्तांनी हे प्रकरण निकाली काढले आहे. यामुळे उच्च न्यायालयापाठोपाठ आता लोकायुक्तांकडूनही मुंडे यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.Dhananjay Munde



या तक्रारीवर निरीक्षण नोंदवताना लोकायुक्तांनी स्पष्ट केले की, कृषी खरेदी प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आधीच लागू झाला असून याचिकाकर्त्यांनी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितलेली नाही. उच्च न्यायालयाचा हा आदेश लोकायुक्तांवर कायदेशीररीत्या बंधनकारक असल्याने, त्या निर्णयाच्या विरोधात कोणताही वेगळा किंवा विपरीत आदेश देणे सध्या शक्य नाही, असे स्पष्ट करत लोकायुक्तांनी ही तक्रार निकाली काढली आहे.

ऑफिस ऑफ प्रॉफिट’ प्रकरणावर भाष्य करताना लोकायुक्तांनी स्पष्ट केले की, भारतीय राज्यघटनेतील कलम 102 आणि 103 नुसार लोकप्रतिनिधीच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींकडे राखीव आहे. त्यामुळे या विशिष्ट विषयावर कोणतीही चौकशी करणे किंवा अंतिम निर्णय देणे हे लोकायुक्तांच्या कार्यकक्षेत येत नाही, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

Dhananjay Munde Given Clean Chit in Alleged Agriculture Department Scam Case

महत्वाच्या बातम्या