विशेष प्रतिनिधी
मुंबई ; Shinde Swift Action इराण-इस्रायल-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील हवाई क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणींमुळे यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने विशेष विमानांची व्यवस्था केली आहे.Shinde Swift Action
दुबईसह यूएईतील विविध भागांत अडकलेल्या मराठी नागरिकांशी शिंदे यांनी स्वतः संपर्क साधत त्यांना धीर दिला आणि त्यांच्या सुरक्षित परतीसाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला.Shinde Swift Action
फुजैरा विमानतळावरून दोन विशेष उड्डाणे
स्टार एअरची दोन विशेष उड्डाणे आज फुजैरा विमानतळावरून रवाना होणार आहेत:
* VT GSO – दुपारी ३.३० वाजता प्रस्थान
* VT GSH – दुपारी ४.३० वाजता प्रस्थान
या दोन्ही विमानांमधून एकूण १६४ प्रवासी सायंकाळी ५.३० ते ७.०० दरम्यान मुंबई विमानतळावर दाखल झाले.
या प्रवाशांमध्ये पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आणि इतर भागांतील नागरिकांचा समावेश आहे.
दोन दिवसांपूर्वी शिंदे यांनी अडकलेल्या नागरिकांशी संवाद साधून, “तुम्ही सुरक्षित आहात, चिंता करू नका. महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असा विश्वास दिला होता. त्यानंतर विमान प्राधिकरणे आणि इतर संबंधित संस्थांशी सातत्याने संपर्क ठेवून अखेर त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा करण्यात आला.
अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगाही सुरक्षित परतणार
दरम्यान, मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी त्यांचा मुलगा अभिनय सुभेदार कुवैत विमानतळावर अडकल्याची माहिती देत मदतीचे आवाहन केले होते. लंडनला जात असताना संघर्षजन्य परिस्थितीमुळे तो अडकला होता.
या प्रकरणात शिंदे यांच्या कार्यालयाने तात्काळ संपर्क साधून अभिनयसाठी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. शिंदे यांनी स्वतः विशाखा सुभेदार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या मुलगा सुरक्षित असल्याची माहिती दिली.
विमान सेवा सुरळीत होताच अभिनय सुभेदार याला सुरक्षितपणे मुंबईत परत आणले जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.
Shinde’s Swift Action: 164 Stranded Maharashtrians to Fly Home Today
महत्वाच्या बातम्या
- Pune Residents : पुणेकरांनो सावधान! होळीला ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ कराल तर थेट पोलीस कोठडी; ३० ठिकाणी कडक नाकेबंदी!
- Eknath Shinde : दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट संवाद
- Anti-Encroachment : अतिक्रमण कारवाईस विराेध महागात, एमआयएमच्या 11 नगरसेवकांवर गुन्हे दाखल
- The Kerala Story 2: द केरला स्टाेरी २ चाही बाॅक्स ऑफिसवर जलवा, पहिल्याच विकेंडला 10.40 कोटींची कमाई