विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राज्यसभेसाठी पाठिंबा द्यावा अशी गळ घातली. मात्र, शरद पवार यांनी निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा विराेध कायम आहे. ही जागा ठाकरे गटालाच मिळावी अशी भूमिका आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी घेतली आहे.Aditya Thackeray
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काहीच दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीचे मात्र अद्याप काही ठरत नसल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीच्या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामाेर्तब व्हावे अशी शरद पवार गटाची मागणी आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गट ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी आग्रही आहे. राज्यसभेच्या जागेचा अद्याप कोणताही निर्णय झाला नाही, मविआच्या नेत्यांमध्ये याची चर्चा सुरू असल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.Aditya Thackeray
राज्यसभेच्या जागेचा कुठलाही निर्णय झाला नसून महाविकास आघाडीचे नेते एकत्रित मिळून निर्णय लवकरच घेतील असं आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, पण राज्यसभेच्या जागेवर अद्याप निर्णय झाला नाही. महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित बसून निर्णय घेतील असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.Aditya Thackeray
NCP SCP leaders Supriya Sule ji and Jayant Patil ji met Uddhav Thackeray ji at Matoshri today.
🚨 No decision has been made on the Rajya Sabha seat as yet, and will be made soon.🚨
All MVA partners will be together for discussions on the seat and the political alignments.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 3, 2026
येत्या 16 मार्च रोजी राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यातील पाच जागा या महायुतीच्या निवडून येणार हे निश्चित आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार आहे. त्याच जागेवरून आता मविआतील तीनही पक्षांमध्ये चढाओढ असल्याचं दिसतंय.Aditya Thackeray
अगदी सुरुवातीपासून आदित्य ठाकरे राज्यसभेची जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला न देता आपल्या पक्षाला मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. शरद पवारांच्या उमेदवारीबाबत मविआतील तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये एकमत होत असताना आणि शरद पवार यांच्या नावाचा निर्णय होत असताना, अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेतील एका गटाकडून ही जागा आपल्यालाच मिळावा यासाठी आग्रह आहे.Aditya Thackeray
Aditya Thackeray is against giving a Rajya Sabha seat to Sharad Pawar!
महत्वाच्या बातम्या
- Pune Residents : पुणेकरांनो सावधान! होळीला ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ कराल तर थेट पोलीस कोठडी; ३० ठिकाणी कडक नाकेबंदी!
- Eknath Shinde : दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट संवाद
- Anti-Encroachment : अतिक्रमण कारवाईस विराेध महागात, एमआयएमच्या 11 नगरसेवकांवर गुन्हे दाखल
- The Kerala Story 2: द केरला स्टाेरी २ चाही बाॅक्स ऑफिसवर जलवा, पहिल्याच विकेंडला 10.40 कोटींची कमाई