विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणासंदर्भात शरद पवार गटाच्या चर्चेला अजित पवार गटाच्या नेत्यांनी भीक घातली नाही. त्यातच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाशी संबंध ताणले गेले. ज्येष्ठ नेते शरद पवारांचे राज्यसभेवरील जाणेच अवघड झाले. यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपला असल्याची कबुली शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.Jayant Patil
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल ठाकरेंशी काहीही चर्चा झाली नाही. पण आता हा विलीनीकरणाचा विषयच नाही, कारण ज्यांच्याशी चर्चा केली ते आज दुर्दैवाने आपल्यात नाहीत त्यामुळे आता तो प्रश्नच नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे गटाकडून आमच्या कुठल्या नावाला विरोध झाला असे काही नाही. प्रत्येक पक्षाला आपल्या विद्यमान उमेदवारासाठी जागा मिळावी असे वाटत असते.Jayant Patil
जयंत पाटील म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्या निधनामुळे पूर्णपणे थांबलेली आहे. आता ही चर्चा पुढे जाणे शक्य नाही आणि आम्ही कुणासोबत चर्चाही करत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना काय आहे हे समजून घेणाराच आता नसल्याने विलीनीकरणाची पूर्णपणे थांबली असून यापुढे ही शक्यता नाही. विलीनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्या आग्रहाने सुरू झाली होती ती पूर्ण होऊ शकली नाही. आता हा प्रश्न बाजूला गेलेला आहे. आमच्यावर दोन्हीही पक्षाला शंका असण्याचे कारण नाही.Jayant Patil
जयंत पाटील म्हणाले की, काल मी आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शरद पवार यांनी दिल्लीत असणे गरजेचे आहे, त्यासाठी त्यांची राज्यसभेसाठी निवड करण्यात यावी अशी आमची इच्छा आहे ती उद्धव ठाकरेंच्या कानावर घातली. आमच्या पक्षाने आणि काँग्रेसने एकत्र बसत काल किंवा आज निर्णय घेऊ असा उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितले. मिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करणार आहोत.Jayant Patil
जयंत पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे यांचे बरोबर आहे अजून राज्यसभेसंदर्भात काहीही निर्णय झालेला नाही. निर्णय झाला असे आम्हीही सांगितले नाही. मविआतील सर्व पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. मविआ आणि राष्ट्रवादीसाठी शरद पवार दिल्लीत असणे गरजेचे आहे. शरद पवारांनी राज्यसभेवर जावे यासाठी आम्ही आज सुद्धा चर्चा करणार आहोत. आता फक्त राज्यसभेची चर्चा सुरू आहे. Jayant Patil
“Merger Issue Closed”: Jayant Patil Admits After Talks with Thackeray Camp
महत्वाच्या बातम्या
- Pune Residents : पुणेकरांनो सावधान! होळीला ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ कराल तर थेट पोलीस कोठडी; ३० ठिकाणी कडक नाकेबंदी!
- Eknath Shinde : दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट संवाद
- Anti-Encroachment : अतिक्रमण कारवाईस विराेध महागात, एमआयएमच्या 11 नगरसेवकांवर गुन्हे दाखल
- The Kerala Story 2: द केरला स्टाेरी २ चाही बाॅक्स ऑफिसवर जलवा, पहिल्याच विकेंडला 10.40 कोटींची कमाई