विशेष प्रतिनिधी
पुणे : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुबई येथे अडकलेल्या जिल्ह्यातील एकूण १८४ नागरिकांपैकी १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले आहेत. तसेच १९ नागरिकांच्या विमान उड्डाणाची वेळ बदलण्यात आली असून ५४ नागरिकांना परत आणण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.Brought back citizens
भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा.Brought back citizens
पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवेत, बहारीन, मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबूधाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले असून, दूतावासांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.Brought back citizens
परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासांशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. केंद्र सरकार व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून, महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्कता बाळगली जात आहे.Brought back citizens
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही आवश्यकता असल्यास जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या ०२०-२६१२३३७१/२६१३३५२२/२६१३३५२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.Brought back citizens
111 Citizens Return Safely to Pune from Dubai; Efforts On to Bring Back Others
महत्वाच्या बातम्या
- Pune Residents : पुणेकरांनो सावधान! होळीला ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ कराल तर थेट पोलीस कोठडी; ३० ठिकाणी कडक नाकेबंदी!
- Eknath Shinde : दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट संवाद
- Anti-Encroachment : अतिक्रमण कारवाईस विराेध महागात, एमआयएमच्या 11 नगरसेवकांवर गुन्हे दाखल
- The Kerala Story 2: द केरला स्टाेरी २ चाही बाॅक्स ऑफिसवर जलवा, पहिल्याच विकेंडला 10.40 कोटींची कमाई