विशेष प्रतिनिधी
मुंबई : Thackeray Camp मुंबई महापालिकेतील 17 पैकी 6 प्रभाग समिती अध्यक्षपदांसाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकांमध्ये महायुतीने आघाडी घेतली असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर उर्वरित तीन समित्यांपैकी एका ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) आणि दोन ठिकाणी काँग्रेसने अध्यक्षपद मिळवले.Thackeray Camp
या निवडणुकीचे कामकाज महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. मात्र एफ/उत्तर आणि एफ/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. संख्याबळ अधिक असल्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) या पदावर विजय मिळवेल, असे निश्चित मानले जात होते. परंतु ऐनवेळी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे काही नगरसेवक गैरहजर राहिल्याने समीकरण बदलले.Thackeray Camp
त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा शिंदे गटाच्या मानसी सातमकर यांनी अवघ्या एका मताने पराभव केला. या पराभवामुळे ठाकरे गटात नाराजी पसरली आहे.Thackeray Camp
विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाने निवडणुकीसाठी व्हिप जारी केलेला असतानाही काँग्रेसच्या नगरसेविका आयशा वणू या मतदानाला अनुपस्थित राहिल्या. त्याचप्रमाणे समाजवादी पक्षाच्या इरम सिद्दीकी याही गैरहजर राहिल्या. परिणामी मानसी सातमकर यांना भाजपची 5 आणि शिंदे गटाची 3 अशी एकूण 8 मते मिळाली. तर श्रद्धा जाधव यांना ठाकरे गटाची 6 आणि मनसेचे 1 असे एकूण 7 मते मिळाली.
काँग्रेसच्या आयशा वणू यांच्या गैरहजेरीवर पक्षाकडून काय कारवाई होणार आणि या घडामोडींवर ठाकरे गटाची पुढील भूमिका काय असेल, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, उर्वरित प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले. ‘आर/मध्य’ आणि ‘आर/उत्तर’ प्रभाग समित्यांसाठी भाजपचे प्रकाश दरेकर यांची बिनविरोध निवड झाली. तसेच ‘सी’ आणि ‘डी’ प्रभाग समितीसाठी भाजपचे आकाश राज पुरोहित यांचाही एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडून आले.
शिवाय ‘आर/दक्षिण’ प्रभाग समितीसाठी भाजपच्या लीना देहरकर यांच्याविरोधात कोणताही उमेदवार उभा न राहिल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली.
काँग्रेसला दोन समित्यांमध्ये यश
‘पी/पूर्व’ आणि ‘पी/पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे हैदरअली शेख यांनी 10 मते मिळवत विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अजित रावराणे यांना 8 मते मिळाली.
तसेच ‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ प्रभाग समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक ज्ञानराज निकम यांनी 7 मते मिळवत विजय मिळवला. त्यांच्या विरोधात उभे असलेल्या भाजपच्या रोहिदास लोखंडे यांना 5 मते मिळाली. अवघ्या दोन मतांनी निकम विजयी झाले.
या निकालांमुळे महायुतीला स्पष्ट वरचष्मा मिळाला, तर ठाकरे गटाला अनपेक्षित धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Mahayuti Gains Edge in BMC Ward Committee Elections, Setback for Thackeray Camp
महत्वाच्या बातम्या
- Uday Samant : दावोस करारांवर लवकरच ‘भगवी पत्रिका’; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती
- Mundhe : तुकाराम मुंडे यांचा कारवाईचा बडगा, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणारे 316 अधिकारी – कर्मचारी निलंबित
- Navnath Bane : उबाठा गटाचे निर्णय आता उद्धव ठाकरे नव्हे, तर संजय राऊत घेऊ लागलेत ! नवनाथ बन यांची टीका
- पुण्यातील प्रसिद्ध वसतिगृहात विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीमार; कारणही धक्कादायक, अनेक विद्यार्थी जखमी!