विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेड येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात बीएचएमएसचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने खासगी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्ह्यासह अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकांक्षा मुंजाजी गायकवाड (रा. वाजेगाव) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. ती हडको येथील पद्मश्री श्यामराव कदम होमिओपॅथी महाविद्यालयात बीएचएमएस द्वितीय वर्षात शिकत होती. ती महाविद्यालयालगत असणाऱ्या जीवन घोगरे पाटील यांच्या निवासस्थानी असणाऱ्या खासगी वसतिगृहात राहत होती. Jeevan Ghogare Patil
शुक्रवारी दुपारी तिने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब निदर्शनास आली. आकांक्षांचे वडील मुंजाजी गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आकांक्षाची वसतिगृहाची 8-10 महिन्यांची फी बाकी होती. ती भरण्यासाठी जीवन घोगरे पाटील तिला वारंवार मानसिक त्रास देत होते. फी वसुलीचा सततचा तगादा व होणाऱ्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. त्यानुसार सिडको ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. Jeevan Ghogare Patil
तत्पूर्वी, वसतिगृह चालकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आकांक्षाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका तिच्या नातलगांनी घेतली होती. यामुळे विष्णुपुरी स्थित शासकीय रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला होता. पण पोलिसांनी पुराव्यांची तपासणी करून शवविच्छेदन अहवाल व तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर दोषींवर कडक कारवाई करण्याची ग्वाही दिल्यामुळे तणाव निवळला. Jeevan Ghogare Patil
आकांक्षाच्या नातेवाईकांच्या दाव्यानुसार, वसतिगृह चालक जीवन घोगरे पाटील यांनी आकांक्षाला त्रास दिल्याचे ठोस पुरावे उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. त्यात काही ऑडिओ क्लिप्सचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
NCP State Secretary Jeevan Ghogare Patil Booked in Medical Student Suicide Case
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेणार; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- Kalakar Katta : गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ वादात नवे वळण; वाहतूक अडथळ्याची अधिकृत नोंदच नाही
- उद्योगपती अनिल अंबानीच्या संबंधित कंपनीवर 15 ठिकाणी ईडीचे छापेमारी
- साेशल मीडियावर व्हायरल वक्तव्य प्रकरणी वसंत माेरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा