CM Revanth Reddy : हैदराबादमध्ये 130 नक्षलवाद्यांचे सामूहिक आत्मसमर्पण; अत्याधुनिक शस्त्रांसह मुख्य प्रवाहात परत

विशेष प्रतिनिधी

गडचिरोली : CM Revanth Reddy  देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे शनिवारी आयोजित विशेष कार्यक्रमात प्रतिबंधित नक्षलवादी संघटनेच्या तब्बल 130 नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत शस्त्रे खाली ठेवून आत्मसमर्पण केले. या घटनेमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.CM Revanth Reddy

आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये संघटनेतील अनेक महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रास्त्रेही पोलिसांच्या स्वाधीन केली. काही दिवसांपूर्वीच संघटनेचे सर्वोच्च नेते पॉलीट ब्युरो सदस्य देवजी आणि केंद्रीय समिती सदस्य संग्राम यांच्यासह चार प्रमुख नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पण केले होते. त्यामुळे नक्षलविरोधी कारवाईला वेग आल्याचे चित्र दिसत आहे.CM Revanth Reddy

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यासाठी 31 मार्च 2026 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांकडून सुरू असलेल्या कठोर कारवाया आणि सरकारच्या प्रभावी पुनर्वसन धोरणांमुळे अनेक नक्षलवादी मुख्य प्रवाहात परत येत असल्याचे दिसून येत आहे. अनेक भागांमध्ये चकमकींमध्ये नक्षलवादी मारले जात असतानाच दुसरीकडे मोठ्या संख्येने नक्षलवादी आत्मसमर्पण करत असल्याने ही मोहीम यशस्वी होत असल्याचे सांगितले जात आहे.CM Revanth Reddy



आत्मसमर्पण केलेल्या 130 नक्षलवाद्यांपैकी 125 जण छत्तीसगडमधील आहेत, तर 4 तेलंगणा आणि 1 आंध्र प्रदेशमधील आहे. यामध्ये संघटनेच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे 3 राज्य समिती सदस्य, 10 विभागीय समिती सदस्य, 46 एरिया कमिटी सदस्य आणि 76 दलम सदस्यांचा समावेश आहे.

आत्मसमर्पणाच्या वेळी नक्षलवाद्यांनी 31 ए.के. 47 रायफल्स, 21 इन्सास रायफल्स, 20 एसएलआर रायफल्स आणि 1 इन्सास एलएमजी रायफल यांसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा प्रशासनाकडे सुपूर्द केला. इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमा झाल्याने सुरक्षा यंत्रणांसाठी ही मोठी यशस्वी कारवाई मानली जात आहे.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की, महात्मा गांधींच्या देशात हिंसा आणि शस्त्रांच्या मार्गाने कोणत्याही समस्येचे निराकरण होऊ शकत नाही. चुकीच्या मार्गावर गेलेल्यांनी आता लोकशाही आणि शांततेच्या मार्गावर परत यावे.

मुख्यमंत्री रेड्डी यांनी नक्षलवाद्यांना बुलेटचे राजकारण सोडून बॅलेटच्या राजकारणात सहभागी होण्याचे आवाहन केले. लोकशाहीत जनतेची सेवा करण्यासाठी आणि हक्कांसाठी लढण्यासाठी निवडणूक हेच सर्वात मोठे आणि प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या सामूहिक आत्मसमर्पणामुळे नक्षलवादाविरोधातील लढ्याला मोठे बळ मिळाले असून, सरकारने ठेवलेल्या 2026 पर्यंत नक्षलवाद संपवण्याच्या उद्दिष्टाकडे देश वेगाने वाटचाल करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Major Blow to Naxal Movement as 130 Maoists Surrender Before Telangana CM Revanth Reddy

महत्वाच्या बातम्या