विशेष प्रतिनिधी
मुंबई : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीमुळे कुवेतमध्ये अडकलेल्या मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाला अखेर सुरक्षितपणे मुंबईत आणण्यात यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली. विशाखा सुभेदार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. Vishakha Subhedar’s Son
विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार हा कुवेतमार्गे लंडनला जात असताना अचानक निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे कुवेतमध्ये अडकून पडला होता. इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हवाई मार्ग बंद झाल्याने अनेक भारतीय नागरिक तेथे अडकले होते.
मुलगा अडकल्याची माहिती मिळताच विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची विनंती केली होती. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या समन्वयातून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनीही या प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावली. कुवेतमध्ये अडकलेल्या नागरिकांना रियाध (सौदी अरेबिया) मार्गे भारतात आणण्याचे नियोजन करण्यात आले. काही जणांच्या व्हिसाचा प्रश्न निर्माण झाला होता; मात्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर तोही सोडवण्यात आला.
यानंतर सुमारे ३० महाराष्ट्रीयन नागरिकांनी कुवेतहून रियाधपर्यंत सुमारे ७०० किलोमीटरचा प्रवास करून तेथून विमानाने भारतात परतण्यास यश मिळवले. ९ मार्च रोजी हे सर्व नागरिक मुंबईत सुखरूप पोहोचले.
मायदेशी परतल्यानंतर अभिनय सुभेदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित यंत्रणांचे आभार मानले. कुवेतमध्ये मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण होते, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुलगा सुखरूप परतल्याने अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुरलीधर मोहोळ तसेच मदत करणाऱ्या सर्व यंत्रणांचे मनापासून आभार मानले.
CM Fadnavis’ Intervention Helps Bring Vishakha Subhedar’s Son Safely Back from Kuwait
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेणार; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- Kalakar Katta : गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ वादात नवे वळण; वाहतूक अडथळ्याची अधिकृत नोंदच नाही
- उद्योगपती अनिल अंबानीच्या संबंधित कंपनीवर 15 ठिकाणी ईडीचे छापेमारी
- साेशल मीडियावर व्हायरल वक्तव्य प्रकरणी वसंत माेरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा