विशेष प्रतिनिधी
मुंबई: गॅसचा तुटवडा होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. काही लोक अफवा पसरवत आहेत, पण कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी गॅस सिलिंडरसाठी एजन्सीच्या बाहेर मोठ्या रांगा लावल्या आहेत. तसेच मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्ये हॉटेल्स व खानावळी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यावर शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. कोणीही अफवा पसरवू नये.
तहसील कार्यालयातील विशेष पथक व गॅस एजन्सीकडून देखील अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. गॅस सिलिंडरचा कुठेही तुटवडा नसून ग्रामीण भागातील दुर्लभ विक्रेत्यांकडे 45 दिवसांनी तर शहरी भागातील ग्राहकांकडे 25 दिवसांनी नियमित पुरवठा केला जाणार आहे. विविध जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयाकडून काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली असून ग्राहकांची कनेक्शन संख्या, सिलिंडर संख्या आदींची तपासणी केली जात आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या तणावाचा परिणाम भारतावर होत असतानाच, ‘शिलॉग’ हे कच्चे तेल वाहून नेणारे जहाज हार्मुजची सामुद्रधुनी पार करून यशस्वीपणे मुंबईच्या समुद्रात दाखल झाले आहे. युद्धजन्य परिस्थितीत कच्च्या तेलाचा मोठा साठा घेऊन मुंबईत येणारे हे पहिलेच जहाज असून, यामध्ये 1 लाख 35 हजार मेट्रिक टन कच्च्या तेलाचा समावेश आहे. सध्या गेटवे ऑफ इंडियापासून काही किलोमीटर अंतरावर उभ्या असलेल्या या जहाजातील तेल साठा पुढील शुद्धीकरणासाठी माहुल येथील रिफायनरीमध्ये पाठवण्यात येणार असून, यामुळे इंधन पुरवठ्याला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
No LPG Shortage, Don’t Believe Rumours: Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- आंतरराष्ट्रीय युद्धाचा फटका शहरातील वसतिगृहांपर्यंत; गॅस टंचाईमुळे चुलीवर स्वयंपाक
- गोकुळ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; 1200 सभासदांच्या पात्रतेवर सुनावणी
- एलपीजी गॅस दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे गुरुवारी राज्यभर आंदोलन
- महाराष्ट्र वेगळे राष्ट्र असते तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये 30 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन