बारामती आणि राहुरीत निवडणूक लादली तर पूर्ण ताकदीने लढण्यास तयार, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी

राहुरी : बारामती आणि राहुरी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच आमची इच्छा आहे, त्यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा. पण जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 39 व्या पदवीदान समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद पदवी) प्रदान करण्यात आली. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्या गाडीवर लाल दिवा नव्हता, तर बोनेटच्या ठिकाणी तो लावलेला होता. यात महापौरांचा कोणताही दोष नाही. नियम सर्वांना माहित आहेत,

पण त्यांना विनाकारण टार्गेट करणे चुकीचे आहे, डॉक्टर ऑफ सायन्स पदवीबाबत मुख्यमंत्री म्हणाले, जेव्हा मला या पदवीबाबत विचारणा झाली, तेव्हा मनात संभ्रम होता. कारण कृषी क्षेत्रात अजून बरेच काम करायचे बाकी आहे. मात्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठासारख्या नामांकित संस्थेचा आदर राखण्यासाठी मी ही पदवी स्वीकारली.

If an election is forced upon Baramati and Rahuri, we are prepared to contest

महत्वाच्या बातम्या