Bihar : बिहारमध्ये एनडीएचा सर्व पाचही जागांवर विजय, महाआघाडीला आमदार फुटल्याने धक्का

विशेष प्रतिनिधी

पाटणा : Bihar बिहारमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लाेकशाही आघाडीने (एनडीए) सर्व पाच जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल व काॅंग्रेस महाआघाडीला माेठा धक्का बसला आहे. महाआघाडीचे ४ आमदार मतदानाला गैरहजर राहिल्याने विरोधी उमेदवार अमरेंद्र सिंह धारी यांचा पराभव झाला.ओडिशामध्येही क्रॉस व्होटिंगमुळे बिजू जनता दलाला मोठा धक्का बसला आहे.Bihar

बिहारमध्ये राज्यसभेच्या ५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एनडीएने ५-० असा दणदणीत विजय मिळवला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी हा मोठा पराभव मानला जात आहे. एनडीएकडून नितीश कुमार, नितीन नवीन, रामनाथ ठाकूर, उपेंद्र कुशवाह आणि शिवेश राम हे विजयी झाले आहेत. महाआघाडीचे ४ आमदार मतदानाला गैरहजर राहिल्याने विरोधी उमेदवार अमरेंद्र सिंह धारी यांचा पराभव झाला. या विजयामुळे बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपची पकड पुन्हा एकदा मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.Bihar



ओडिशात नवीन पटनायक यांच्या बीजेडी पक्षाला अंतर्गत बंडाळीचा मोठा सामना करावा लागला. ४ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत बीजेडीचे ८ आणि काँग्रेसच्या ३ आमदारांनी क्रॉस व्होटिंग करत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार दिलीप रे यांना मतदान केले. क्रॉस-व्होटिंग’मध्ये सहभागी असलेल्या बीजेडी आमदारांमध्ये सौभिक बिस्वाल, देबीरंजन त्रिपाठी, सुभासिनी जेना, नबा मल्लिक, चक्रमाणी कन्हार आणि रामकांत भोई यांसारख्या नावांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, यापूर्वीच पक्षातून निलंबित करण्यात आलेले दोन आमदार सनतन महाकुड आणि अरविंद महापात्र यांनीही पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात मतदान केले.

हरियाणामध्ये ९० पैकी ८८ आमदारांनी मतदान केले. परंतु, ३ विशिष्ट मतांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे परमवीर सिंग, भारत बेनिवाल आणि भाजपचे अनिल विज यांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आला आहे. हा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला आहे. आयोगाचा निर्णय येईपर्यंत हरियाणातील राज्यसभा निकालांची अधिकृत घोषणा प्रलंबित ठेवण्यात आली आहे.

NDA wins all five seats in Bihar, shock as MLAs split from Mahaaghadi

महत्वाच्या बातम्या