भिगवण प्रकरणात मुलीचा अपहरण झाल्याचा जबाब. जहीर शेखविरुद्ध गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

पुणे : भिगवण अपहरण प्रकरणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट समोर आला आहे. संबंधित तरुणीने जहीर शेख विरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार शेख विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जहीर शेखने तिचे अपहरण केल्याचा आरोप तिने केला आहे. यापूर्वी, याच तरुणीने जहीर शेखसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले होते आणि ती स्वतःच्या इच्छेने त्याच्यासोबत गेल्याचे नमूद केले होते. मात्र, आता तिने आपला जबाब बदलत अपहरणाची तक्रार नोंदवली आहे.

तक्रारीत तरुणीने म्हटले आहे की, १७ फेब्रुवारी रोजी ती आई आणि भावासोबत लग्नाच्या खरेदीसाठी बाहेर गेली असताना तिचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणात तिने जहीर शेखचे नाव स्पष्टपणे घेतले असून, पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील 21 वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. संबंधित तरुणी आपल्या आई आणि भावासह लग्नाच्या खरेदीसाठी गेली असताना, तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तरुणीचं अपहरण केल्याची तक्रार करण्यात आली होती.



या प्रकरणी सुरुवातीला तरुणीने कोर्टात येऊन जबाब नोंदवला. आपलं संबंधित तरुणावर प्रेम आहे, स्वतःच्या मर्जीने आपण त्याच्यासोबत गेलो होतो, असा जबाब तरुणीनं कोर्टात दिला होता. शिवाय तिने प्रतिज्ञापत्र दाखल करत आई आणि भावाने दाखल केलेली फिर्याद पूर्णपणे खोटी असल्याचं सांगितलं होतं.

त्यानंतर पीडित तरुणीला सुधारगृहात पाठवण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव तिची रवानगी सुधारगृहात केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्यानंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला. बारामती पोलीस ठाण्यात आणि कोर्टात मुलासोबत राहायचं असल्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या मुलीनं नंतर तिचा जबाब बदलला. भिगवण प्रकरणातील मुलीनं आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली.

भिगवण प्रकरणातील मुलगी जहीर शेख या तरुणासोबत 17 फेब्रुवारी रोजी निघून गेल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. भिगवणमधून निघून गेल्यानंतर बारामती पोलीस स्टेशनला 20 फेब्रुवारीला तरुणासह हजर झाली होती.

भिगवण अपहरणात प्रकरणातील तरुणीने इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर आपल्याला आईकडे आणि मामाकडे जायची इच्छा व्यक्त केली. 20 फेब्रुवारी रोजी बारामती सत्र न्यायालयासमोर या तरुणीने आपण आईसोबत जाणार नसून जहीर शेख सोबतच जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर नंतर इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हीसीद्वारे या प्रकरणातील सुनावणी पार पडली. इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने संबंधित तरुणीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काही प्रश्न विचारले. यावेळी संबंधित तरुणींना आई आणि मामा सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली.

Bhingwan Case: Kidnapping Complaint Filed Against Jahir Sheikh

महत्वाच्या बातम्या