महाराष्ट्राच्या संपन्नतेचा दाखला देत इराणने दाखवला डाेनाल्ड ट्रम्प यांना आरसा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारत नरकासमान असल्याची टीका करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी कुणीतरी सांस्कृतिक शुद्धीकरणाची सफर बुक करायला हवी, असे म्हणत महाराष्ट्राच्या संपन्नतेचा दाखला देत इराणने अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. Donald Trump

इराणच्या मुंबई स्थित उच्चायोगने ट्रम्प यांच्या विधानावरून निशाणा साधलाआहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्माधारित नागरकित्वासंबंधी लिहिलेल्या एका पत्रात भारत व चीन हे नरकासमान असल्याची टीका केली आहे. ट्रम्प यांच्या या विधानावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ट्रम्प यांची ती टिप्पणी व अमेरिकन दुतावासाने त्यावर दिलेले स्पष्टीकरण आम्ही पाहिले. पत्रातील विधान अपुऱ्या माहितीवर आधारित व अनुचित आहे. भारत व अमेरिकेतील संबंधांचे प्रतिबिंब त्यात नक्कीच नाही, असे भारताने म्हटले आहे. Donald Trump



इराणच्या मुंबई स्थित महावाणिज्य दुतावासाने महाराष्ट्राच्या संपन्नतेचा दाखला देणारा एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात महाराष्ट्राची निसर्गसंपन्नता किती भव्य आहे याचा दाखला दिला. कुणीतरी ट्रम्प यांच्यासाठी सांस्कृतिक शुद्धीकरणाची सफर बुक करायला हवी. तेव्हाच कदाचित त्यांची ही वायफळ बडबड बंद होईल. कधीतरी भारतात येऊन बघा. मग बोला, असे इराणी दुतावासाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Iran holds up a mirror to Donald Trump, citing Maharashtra’s prosperity

महत्वाच्या बातम्या