विशेष प्रतिनिधी
पुणे : गंगाधाम चौक येथील आईमाता मंदिर परिसरात बुधवारी मध्यरात्री एका केमिकल कंपनीतील टाकीतून गॅस गळती झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेत 24 नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बीए सेट परिधान करून बचावकार्य सुरू केले. बाधितांपैकी 14 नागरिकांना शासकीय 108 रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच अग्निशमन दलाचे एक अधिकारी व एक जवान यांनादेखील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच अधिकारी आणि सुमारे 30 जवानांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडत मोठा धोका टाळला. घटनास्थळी बीए सेट वाहनासह चार अग्निशमन वाहने तैनात करण्यात आली होती.वेळीच केलेल्या या धाडसी कारवाईमुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली.
Midnight gas leak at Gangadham Chowk leaves 24 residents
महत्वाच्या बातम्या
- मराठी अनिवार्यतेवर सरकार ठाम; चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतीची शक्यता..
- प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पोलिसांत तक्रार
- शिवसेनेत गोऱ्हे – कडूंचा नावाला विरोध? एकनाथ शिंदेच्या पुढचा पेच वाढला…
- धर्माच्या भावनेने बघू नका, मराठी आलीच पाहिजे : इम्तियाज जलील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन