विशेष प्रतिनिधी
पश्चिम बंगाल:भाजपाने पश्चिम बंगालमध्ये मिळवलेल्या इतेहासिक विजयानंतर आता मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली आहे.राज्यात प्रथमच सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? हा मोठा प्रश्न राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा ठरत आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुभेंदु अधिकारी यांचे नाव आघाडीवर आहे.आजपर्यंत बंगालमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची मानली जाते.मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत इतर देखील नेते आहेत.
भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, सध्याचे प्रदेशाध्यक्ष शामिक भट्टाचार्य, उत्पल ब्रह्मचरराव, स्वप्नदास गुप्ता,रूपा गांगुली आणि अग्नमित्रा पॉल यांची नावे चर्चेत आहेत.
आघाडीवर कोणाचे नाव?
सुभेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अग्रस्थानी आहेत. दोन मतदारसंघातून विजय मिळवणे आणि ममता बॅनर्जी यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव करणे,या दोन मोठ्या अणि महत्वाच्या कारणांमुळे सुभेंदू अधिकारी यांच्या नावाची अधिक चर्चा आहे.
दरम्यान,उमेदवारी अर्ज भरताना गृहमंत्री अमित शहा हे सुभेंदू अधिकारी यांच्यासोबत सोबत उपस्थित होते.त्यामुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा त्यांच्यावर अधिक विश्वास असल्याचे बोलले जात आहे.
Who will be the Chief Minister of West Bengal? There is a lot of discussion about “these” names…
महत्वाच्या बातम्या
- ‘मला खोटं गोवलं’ आरोपीचा दावा फेटाळला; नसरापूर प्रकरणात तपास अधिक तीव्र
- पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा ३१ मेपर्यंत सुरू होण्याची शक्यता…
- विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार, अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद
- टीसीएस बीपीओ प्रकरण: निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळला, अटकेची टांगती तलवार