विशेष प्रतिनिधी
नागपूर : CM Fadnavis पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती, वाढते तेल दर आणि जागतिक पुरवठा साखळीवरील संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना इंधन बचतीचे मोठे आवाहन केले आहे. “शेजारील देशांमध्ये पेट्रोलचे दर ४५० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहेत. आपण वेळीच सावध व्हायला हवे,” असा इशारा देत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संयम आणि बचतीच्या आवाहनाचे पालन करण्याचे आवाहन केले.CM Fadnavis
पंतप्रधान मोदी यांनी हैदराबादमधील सभेत पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर कमी करण्याचे तसेच पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना जागतिक परिस्थितीची गंभीरता स्पष्ट केली.CM Fadnavis
ते म्हणाले, “अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जगभरात तेल आणि गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. भारतात सध्या पुरवठा सुरळीत ठेवण्यात यश आले असले, तरी नागरिकांनी इंधनाचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे.”
फडणवीस यांनी पाकिस्तानचे उदाहरण देत परिस्थिती किती गंभीर बनू शकते, याचा इशाराही दिला. “आपल्या शेजारील पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर ४५० रुपयांवर गेले आहेत. इतक्या कठीण परिस्थितीतही भारतात पुरवठा खंडित होऊ दिला नाही, ही मोठी बाब आहे. मात्र याचा अर्थ आपण बेफिकीर राहावे असा नाही,” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना कारपूलिंग, सार्वजनिक वाहतूक आणि मेट्रोचा वापर वाढवण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, आगामी काळात जागतिक परिस्थिती आणखी गंभीर झाली तर त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी रविवारी हैदराबादमधील सभेत ‘वर्क फ्रॉम होम’, मेट्रो वापर, इंधन बचत आणि परकीय चलन वाचवण्यासाठी सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. भारताकडे मोठ्या तेल विहिरी नसल्याने जागतिक संकटाचा परिणाम देशावर अधिक होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले होते.या पार्श्वभू
मीवर आता राज्य सरकारकडूनही इंधन बचत, संयम आणि संसाधनांचा नियंत्रित वापर यावर भर दिला जात असून, येत्या काळात नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे संकेत दिले जात आहेत.
“Petrol Costs ₹450 in Neighbouring Nations, India Must Act Early”: CM Fadnavis Backs PM Modi’s Fuel-Saving Appeal
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी