२०२९ साठी राष्ट्रवादीची मोठी तयारी; प्रशांत किशोरांकडे रणनीतीची धुरा?

विशेष प्रतिनिधी

पुणे: पुढील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि २०२९ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘ डिझाईन बॉक्स ‘ या कंपनीनंतर नवीन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले जाणार आहे.देशातील प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर याच्याकडे जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगीतले जात आहे.

१९ मे रोजी झालेल्या बैठकीत या संदर्भात महत्वाची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.बैठिकला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, आणि प्रशांत किशोर उपस्थित होते.या बैठकीत पुढील निवडणुकांची रणनीती, संघटना बांधणी, मतदारांपर्यंत पोहोचणे आणि पक्ष मजबूत करणे याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.



बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाल्यानंतर, पुढील दोन दिवसात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशांत किशोर अधिकृतपणे काम सुरू करणार आहेत.विशेष म्हणजे, १ जूनपासून प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणनीतीकर म्हणून काम पाहणार असल्याचे सांगीतले जात आहे.

कोण आहेत प्रशांत किशोर?

प्रशांत किशोर हे भारतीय राजकीय रणनीतीकार आणि ‘जन सुराज’ पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रचार मोहीम राबवल्या नंतर ते देशभरात प्रकाशझोतात आहे.प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी, वाय.एस जगनमोहन रेड्डी, एम के स्टॅलिन आणि अरविंद केजरीवाल यांच्यासाठी देखील निवडणूक रणनीती आखली.प्रशांत किशोर यांनी आठ वर्षे संयुक्त राष्ट्रसंघासोबत आरोग्य क्षेत्रात काम केले आहे.

NCP’s big preparations for 2029; Will Prashant Kishor be the strategic leader?

महत्वाच्या बातम्या