विशेष प्रतिनिधी
पुणे: शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.पुणे मेट्रोकडे शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणून पाहिले जात आहे. अशातच पुणे महामेट्रोकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.पुणे मेट्रोच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावर १०० महिला मेट्रो पायलट नियुक्त करण्यात येणार असून, संपूर्ण मेट्रो संचालनची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर असणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर हा २३ किलोमीटर लांबीचा मेट्रोमार्ग सध्या प्रगतीपथावर आहे.मोठ्या आयटी कंपनी क्षेत्रात कामकाज असलेल्या हिंजवडी परिसराला पुणे शहराशी जोडणारा महत्वाच प्रकल्प आहे.मात्र या प्रकल्पातील मेट्रो चालवण्याची जबाबदारी पूर्णपणे महिलांकडे सोपवण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या महिला पायलट्सना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. सुरक्षितता,तांत्रिक कौशल्य आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात येणार आहे.विशेष म्हणजे, कामाच्या ठिकाणावरून ते प्रवासापर्यंतच्या सुरक्षेची जबाबदारी एका खासगी कंपनीला देण्यात आली आहे.त्यामुळे या या प्रकल्पातून महिलांचे सक्षमीकरण होणार असल्याचे बोलले जात आहे.
Pune Metro’s big decision; Women will drive metro on Hinjewadi-Shivajinagar route
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
- महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- पुण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनाआधीच वाद; श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने चर्चा