प्रशासकीय गतिमानतेसाठी मंत्रालयातील विभागांची संख्या ३३ वरून ४५

विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असणाऱ्या ३३ प्रशासकीय विभागांची संख्या ४५ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार हा निर्णय घेण्यात आला.

सध्या मंत्रालयात ३३ प्रशासकीय विभाग आहेत. यामध्ये एकाच विभागात दोन अथवा तीन उपविभाग आहेत. असे असले तरी विभागाची आस्थापना एकाच विभागप्रमुखांकडे असते. मात्र, उपविभागाचे कामकाजाचे स्वरूप भिन्न आणि स्वतंत्र असते. यामुळे विभागांचे सुसूत्रीकरण करुन कार्यक्षमता सुधारण्यासाठी पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



कृषी व पदुम विभागाचे विभाजन करून कृषी विभाग आणि पदुम विभाग असे दोन स्वतंत्र विभाग – सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे विभाजन; आता तीनही विभाग स्वतंत्र- सामान्य प्रशासन विभागातून स्वतंत्र राजशिष्टाचार विभाग- गृहमधून स्वतंत्र परिवहन विभाग- उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचे विभाजन करून उद्योग व खनिकर्म, ऊर्जा आणि कामगार असे तीन स्वतंत्र विभाग- महसूल, मदत व पुनर्वसन आणि वन विभाग असे तीन स्वतंत्र विभाग- शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग असे दोन स्वतंत्र विभाग.- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे विभाजन करुन दोन्ही स्वतंत्र विभाग.- वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे विभाजन करुन स्वतंत्र अन्न व औषध प्रशासन विभाग होईल.- नियोजन विभागातील रोजगार हमी योजना उपविभागाचा समावेश मृद व जलसंधारण विभागामध्ये करण्यात आला.

The number of departments in the ministry has been increased from 33 to 45 for administrative efficiency.

महत्वाच्या बातम्या