विशेष प्रतिनिधी
पंढरपूर: Rohit Pawar शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी आमदार रोहित पवार यांचे गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरु होते. आज अखेर त्यांनी तीन दिवसानंतर आंदोलन मागे घेतले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रोहित पवारांनी उपोषण मागे घेतले. 22 जूनच्या आधी मुंबईत बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावल्याची माहिती रोहित पवार यांनी सांगितले.Rohit Pawar
राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील जाचक अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ उपोषण सुरू केले होते.Rohit Pawar
शेतकऱ्यांच्या वतीने 4 जुलैला मोठे आंदोलन घेणार आहोत असे रोहित पवार म्हणाले. आपली बैठक ठरली आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये ही आमची भूमिका असल्याचे रोहित पवार म्हणाले. यावेळी रोहित पवार यांनी गिरीश महाजन यांचे अभिनंदन केले. कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले आहे. मी ज्या मतदारसंघात काम करतो तिथेच अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला आहे. सरकारनं काढलेला जीआर महत्वाचा आहे. सरकारचे अभिनंदन करतो. फक्त या जीआरमध्ये अनेक अटी आहेत. यामुळं अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. 2019 ची कर्जमाफी झाली. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला त्यांना आताच्या या योजनेमध्ये लाभझाला पाहिजे. सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी आहे. रविकांत तुपकर बुलढाण्यात ते आंदोलन करत आहेत. त्यांना देखील भेटा असे रोहित पवार म्हणाले. रेग्युलर शेतकऱ्यांना 50 हजारांचे लिमिट आहे ते वाढवाले पाहिजे असे रोहित पवार म्हणाले.
सरकारला विनंती आहे की, येणारं वर्ष कठीण आहे यंदा पाऊस कमी पडणार आहे. शेतात काही पिकणार नाही. पिके जळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं कर्जमाफी योजना अटीशिवाय लागू करणं गरजेचं आहे असे रोहित पवार म्हणाले. त्याचबरोबर 1 रुपयामध्ये जी पिक विमा योजना होती. ती पिक विमा योजना परत सुरु करावी अशी विनंती देखील रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार म्हणाले की, मला फक्त सगळ्या शेतकरी बांधवांना एकच विचारायचे आहे की, हे आंदोलन राजकीय नव्हते. आपण शेतकऱ्यांसाठी बसलो आहोत. कृषिमंत्री साहेबांनी देखील आपल्याला ग्वाही दिली आहे, गिरीश महाजन देखील आत्ता आपल्याला बोलले आहेत. पण मला असे वाटते की यात अजून ओढाताण केली तर शेतकऱ्यांचे नुकसान आहे. अधिवेशनाच्या आधी आपण चर्चा करूया. मला असे वाटत आहे की यातून दोन्ही अटी काढल्या जातील. मी सरकारला आग्रह करेल की आमच्या मागण्या मान्य कराच. जर सरकार याबाबतीत बैठक घ्यायला तयार असेल तर मग आपण चर्चेला मुख्यमंत्र्यांकडे जायचे का? असा सवाल पवारांनी आंदोलकांना व शेतकरी बांधवांना विचारला, त्यावर शेतकऱ्यांनी होकार उत्तर दिले. त्यानंतर रोहित पवारांनी सरकारचे आभार व्यक्त केले.
Rohit Pawar withdraws hunger strike in the presence of Girish Mahajan
महत्वाच्या बातम्या