Ravindra Dhangekar : रविंद्र धंगेकर अडचणीत येणार ? भागिदारी असलेल्या बांधकाम व्यावसायिकाने गळफास घेऊन केली आत्महत्या !

विशेष प्रतिनिधी

महत्वाचे मुद्दे
१. माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नीसोबत व्यवसायिक भागिदारी असलेल्या बांधकाम व्यावसायिकाने जीवन संपवले
२. आत्महत्या करण्याआधी खलील शेख यांनी व्हिडीओ शूट करुन गंभीर आरोप केले.
३. आर्थिक अडचणींकडे रविंद्र धंगेकरांचे दुर्लक्ष असल्याचे आरोप

पुणे : Ravindra Dhangekar  पुण्यातील माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण त्यांच्या पत्नीसोबत व्यवसायिक भागिदारी असलेल्या बांधकाम व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. खलील शेख असं या बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करत असल्याचे आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये खलील शेख यांनी म्हटले आहे. ‌



पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी रविंद्र धंगेकरांच्या (Ravindra Dhangekar) पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह आणखी चार भागिदारांनी मिळून ‘उत्कर्ष असोसिएट’ नावाची कंपनी स्थापन करण्यात आली होती. या कंपनीत मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे यांच्यासह खलील या बांधकाम व्यावसायिकाचा देखील समावेश होता. वक्फ बोर्डाची जागा विकत घेऊन त्या जागेवर बांधकाम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी बँकांकडून कर्जे घेण्यात आली होती.

आर्थिक अडचणींकडे रविंद्र धंगेकरांचं दुर्लक्ष

वक्फ बोर्डाकडून स्थगिती मिळाल्यानंतर सदर प्रकरण न्यायालयात पोहोचले. पण पुन्हा बांधकाम सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या खलील याने गुलटेकडी भागातील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करत असल्याचे खलील शेख यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आर्थिक अडचणींकडे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)  दुर्लक्ष करत असल्याचे देखील खलील शेख व्हिडीओमध्ये म्हणाले.

आत्महत्या करण्याआधी खलील शेख व्हिडीओमध्ये काय म्हणाले ?

‘उत्कर्षा कंपनी’ याचे पार्टनर रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी, बाळासाहेब शेडगेंच्या पत्नी, सुनील आहेरांचा मुलगा, हमीद शेखचा मुलगा आणि रघु गावडे हे स्वतः पार्टनर आहेत. पण माझं यांनी एक बिल घेतलेले आहे. त्याच बिलाचे पेमेंट 20 लाख रुपये आहे. परंतु ते दिलेले नाही. आणि दोन बिलं यांनी घेतलेले नाहीत. अशा त्या दोन बिलाचे पेमेंट 15-15 लाख रुपये आहे, हे 30 लाख रुपये. असे यांच्याकडून एकूण 50 लाख रुपये येणे आहे. मी तीन वर्षांनी ह्या 50 लाखांचे 4 टक्क्याने व्याज भरतोय. बाळासाहेब शेडगे माझे पैसे देत नाहीय. दादागिरी आणि भाईगिरी करत आहे. स्वतःला हा खूप मोठा माणूस समजतोय. याच्यामुळे पुढे माझ्या मुलाला पण धोका होऊ शकतो,  मार्केटमध्ये काम करायला पण अडचण आणू शकतो. मला पण दोन-चार वेळेस बाळासाहेब शेडगेने धमकी दिलेली आहे. फार त्रास दिला तर मार्केटमध्ये कुठेही काम करू देणार नाही. किंवा तुला पुण्यात जगणं मुश्किल करीन, तुमच्या लेकराबाळाला पण जगणं मुश्किल करेन, अशा बाळासाहेब शेडगेंनी मला धमक्या दिल्या आहे. आज मी तर फाशी घेणारच आहे. बाकी माझ्या लेकरा-बाळाला त्रास झाला तर यासाठी बाळासाहेब शेडगे आणि त्यांचा मुलगा जबाबदार असेल, असे खलील शेख या व्हिडिओमध्ये म्हणाले आहे.

दरम्यान, या प्रकरणावर रविंद्र धंगेकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, विविध कर्जजास्त झाल्यामुळे खलील शेख यांनी आत्महत्या केली. ही जागा वक्फची आहे असे आम्हाला पत्र आले, प्रोजेक्ट थांबवा असं सांगण्यात आले. मी अधिकाऱ्यांना सांगितले की, तुम्ही जी कारवाई करताय याने अनेकजण आत्महत्या करतील त्यात मी सुध्दा त्यात असेल असे ते बोलले. वक्फ बोर्डाचा आणि त्या जागेचा काही संबंध आता राहिला नाही. थांबलेल्या कामांमुळे हा प्रोजेक्टा ढासाळला, असे रविंद्र धंगेकरांनी सांगितले आहे.

Will Ravindra Dhangekar face trouble? A real estate developer with whom he had a partnership died by hanging himself!

महत्वाच्या बातम्या