शिवसेना ठाकरे गटही देणार मतदारसंघ पुर्नरचना विधेयकाला पाठिंबा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : एका बाजुला संसंदेत सत्ताधारी पक्षाचे बळ वाढलेले असताना गेल्या वेळी विराेध करणाऱ्या विराेधकांनीही मतदारसंघ पुर्नरचना विधेयकाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. Shiv Sena

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत वक्तव्य केले हाेते. त्यानंतर महाविकास आघाडीत नाराजीही झाली हाेती. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटानेही याच प्रकारची तयारी दर्शविली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत सूचक विधान केलं आहे. विरोधी पक्षांनी दिलेले सल्ले विचारात घेऊन त्यांचा विधेयकात समावेश झाल्यास विधेयकाला पाठिंबा देण्याबाबच विचार करू शकतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.



सुप्रिया सुळे यांनी सरकारने या विधेयकातील तरतुदींबाबत आमच्या मागण्या मान्य केल्या, तर आम्ही या विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत विचार करू, असे विधान केले होते.सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, हे विधेयक या अधिवेशनात मांडलं जाणार की नाही याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही.

जेव्हा हे विधेयक मांडलं जाईल, तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र बसून पुढे काय करायचं याबाबत सामुहिकरीत्या निर्णय घेऊ, आम्ही मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध करणार आहोत. मात्र आमच्या सूचनांनुसार त्यात काही आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात आल्या, तर विरोधी पक्ष त्याला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेऊ शकतो.

Shiv Sena (UBT) to Support Delimitation Bill

हत्वाच्या बातम्या