विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र :- राज्यात बोगस खते, बियाणे आणि किटकनाशकांसाठी फडणवीस सरकारने अखेर एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दिले आहे. spurious fertilizers
चार सदस्यांची समिती स्थापन
राज्यात बोगस बियाणे आणि खतांच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्यानंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींची तातडीने दखल घेण्यासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्या पुन्हा स्थापित करण्यात आल्या आहेत. या समितीचे अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी असणार आहेत . तक्रार मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत घटनास्थळी भेट देऊन तपास करून अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे. तपासणीवेळी संबंधित बियाणे कंपनीचा जबाबदार प्रतिनिधी उपस्थित राहणेही बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून शेतकऱ्याची तक्रार मिळताच समितीने सात दिवसात पाहणी करण्याचे निर्देश देखील यावेळी देण्यात आले आहे. तर 100 हून अधिक तक्रारी आल्यास तालुक्यात एकाहून अधिक समित्या स्थापन केल्या जाणार असल्याची माहिती दिली जात आहे. राज्याच्या कृषी विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे आता तरी बोगस खते, बियाणे आणि किटकनाशकांबाबत ठोस पावले उचलेल जातील अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
कृषी अधिकारी पैसे घेत असल्याचा , आरोप
यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे आणि खते मारल्या गेल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. यासाठी सरकार सोबतच कृषी विभागातील अधिकारी जबाबदार आहे. हे अधिकारी प्रत्येक कृषी केंद्र चालकांकडून पैसे उकळत असल्याचा देखील गंभीर आरोप मनसे नेते राजू उंबरकर यांनी केला आहे. ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली त्यांनी मनसेकडे तक्रारी कराव्यात, जेणेकरून मनसैनिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल. कृषी विभागाचा गुणनियंत्रण विभाग बोगस बियाणे व खतांच्या कंपन्यांशी हात मिळवणी करून असल्याने शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मोफत उपलब्ध करून द्यावे अन्यथा मनसैनिकांच्या रोशाला समोर जावे असा इशाराही राजू उंबरकर यांनी दिला आहे.
Major government decision: Committee set up to tackle spurious fertilizers and substandard seeds!
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा