राष्ट्रवादीला अर्थखाते देण्यास शिंदेंचा विराेध, अमित शहांना साकडे घातल्याची चर्चा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाला अर्थमंत्रीपद मिळू नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना साकडे घातल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र याचा इन्कार केला असून शिंदे असे करणार नाहीत असे म्हटले आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली . त्यांना अर्थ खाते मिळणार अशी चर्चा सुरू झाली. त्याच काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत गेले, तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.राष्ट्रवादीला अर्थ खाते मिळू नये म्हणून शिंदे शहा यांना भेटले अशी चर्चा सुरू झाली आहे.



याबाबत तटकरे म्हणाले, “मला स्वतःला वाटते की, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्रीपद उत्तम पद्धतीने भूषवले आहे. ते इतर पक्षाला विशिष्ट खाते देऊ नये, असे बोलतील हे मला स्वतःला वाटत नाही.”एकनाथ शिंदे हे त्याच्या पद्धतीने राजकारण करणारे नेते आहेत. मित्रपक्षाला काय मिळावे, मिळू नये असे ते बोलल्याचे मला गेल्या तीन वर्षांमध्ये कधी जाणवले नाही. ते जे पाऊल उचलतात, त्याला यश मिळते. ते त्यांचे कर्तृत्व त्या पद्धतीने दाखवतात. त्यांचे राष्ट्रवादीशी सौहार्दाचे संबंध आहेत.

तटकरे म्हणाले की, “अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावे, ही आमची मागणी आहे. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. ती भेट झाल्यावर आम्हाला इतर बाबींवरही चर्चा करायची आहे.

Shiv Sena Opposes Finance Portfolio for NCP, Reports Suggest Appeal to Amit Shah

महत्वाच्या बातम्या